मुंबई, 16 एप्रिल: ICSE सेमिस्टर 2 परीक्षा 2022 (ICSE Semester 2 exam 2022) साठी प्रवेशपत्र लवकरच जारी केले जाईल. कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE Exam 2022) ने 17 एप्रिलपर्यंत ICSE आणि ISC सेमिस्टर 2 प्रवेशपत्र 2022 (ICSE semester 2 exam 2022 hall ticket) जारी करणे अपेक्षित आहे. CISCE 10वी आणि 12वी हॉल तिकिटे cisce.org या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होतील. CISCE ISC आणि ICSE प्रवेशपत्र डाउनलोड (How to download ICSE semester 2 exam 2022 hall ticket) करण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा रोल नंबर/जन्मतारीख प्रविष्ट करणे आवश्यक आहे. CBSE Exam 2022: होम सेंटरवरच व्हावी बोर्डाची परीक्षा; पालक का करताहेत अशी मागणी? वाचा इंडियन स्कूल सर्टिफिकेट, ISC इयत्ता 12 सेमिस्टर 2 च्या परीक्षा 26 एप्रिलपासून आयोजित केल्या जातील, तर इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) किंवा इयत्ता 10 व्या सेमिस्टर 2 च्या परीक्षा 25 एप्रिल 2022 पासून होणार आहेत. ICSE, ISC या दोन्ही परीक्षा पहिल्या दिवशी इंग्रजीतून सुरू होतील. ICSE वर्ग 10 आणि ISC वर्ग 12 ची परीक्षा एक तास 30 मिनिटांच्या कालावधीसाठी घेतली जाईल. मात्र, इयत्ता 10वीच्या परीक्षा सकाळी 10 वाजल्यापासून तर 12वीच्या परीक्षा दुपारी 2 वाजल्यापासून होतील. ISCE सेमिस्टर 2 ची परीक्षा 23 मे पर्यंत सुरू राहील, तर ISC सेमिस्टर परीक्षा 13 जून 2022 रोजी संपेल. परीक्षा, अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या नियमांशी संबंधित तपशीलांसाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. अशा प्रकारे डाउनलोड करा हॉल तिकीट सर्वप्रथम cisce.org या अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइटवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. आता विनंती केलेली माहिती भरा आणि सबमिट करा. तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, आता ते डाउनलोड करा आणि परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी प्रिंटआउट घ्या. CBSE Vs ICSE: सीबीएसई की आयसीएसई? तुमच्या मुलांसाठी कोणतं बोर्ड आहे उत्तम? इथे मिळेल उत्तर ICSE सेमिस्टर 1 ची परीक्षा 29 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान, तर ISC परीक्षा 22 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली. ICSE आणि ISC सेमिस्टर 1 च्या परीक्षेचा निकाल 7 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला.