JOIN US
मराठी बातम्या / करिअर / तुम्हालाही डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात करिअर करायचंय? मग Google वरून फ्रीमध्ये करा सर्टिफिकेशन

तुम्हालाही डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात करिअर करायचंय? मग Google वरून फ्रीमध्ये करा सर्टिफिकेशन

आज आम्ही तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी Google सर्टिफिकेशन नक्की कसं घ्यावं हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

जाहिरात

Google वरून फ्रीमध्ये करा सर्टिफिकेशन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 ऑगस्ट: जग पुढे जात असताना टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातही  प्रचंड प्रगती होत चालली आहे. मानवी यंत्रांपेक्षा आर्टिफिशिअल आणि रोबोटिक्स तसंच ऑटोमेशनला मागणी वाढत चालली आहे. म्हणूनच या क्षेत्रातील प्रोफेशनल्सची गरजही भासू लागली आहे. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नोकऱ्या  भरपूर आहेत मात्र उच्चशिक्षण आणि स्किल्स असणारे फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्स कमी आहेत. जर तुम्हाला टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये (Best career options in Technological sector) करिअर करायचं असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी Google सर्टिफिकेशन नक्की कसं घ्यावं हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. Google त्याच्या लर्निंग पोर्टलवर मोफत डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रम आणि सर्टिफिकेशन देत आहे. या ऑनलाइन कोर्सेसमध्ये नावनोंदणी करून तुम्ही ट्यूटोरियल आणि ऑनलाइन क्लासेसमध्ये प्रवेश करू शकता. हे डिजिटल मार्केटिंग कोर्स तुम्हाला वास्तविक व्यवसाय परिस्थितीसाठी पूर्णपणे तयार करतील. या डिजिटल मार्केटिंग कोर्सेसद्वारे तुम्ही सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सर्च जाहिरातींचा वापर, वेबसाइट ट्रॅफिकचे विश्लेषण असे अनेक कोर्स करू शकता. हे अभ्यासक्रम करण्यासाठी लागणारा जास्तीत जास्त वेळ 2.6 - 40 तास आहे. Google चे मोफत ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग कोर्स तुमच्या CV साठी चांगले आहेत. Interview ला जाण्याआधी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; फक्त तुम्हालाच मिळेल जॉब

फंडामेंटल ऑफ डिजिटल मार्केटिंग

Google द्वारे आयोजित डिजिटल मार्केटिंग कोर्सची मूलभूत तत्त्वे इंटरएक्टिव्ह, अॅडव्हर्टायझिंग ब्युरोद्वारे मान्यताप्राप्त आहेत. हा कोर्स व्यावहारिक व्यायाम आणि वास्तविक जीवनातील उदाहरणांद्वारे तुमचे ज्ञान कृतीत रूपांतरित करण्यासाठी कार्य करतो. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी 40 तास लागतात. गूगल AD डिस्प्ले सर्टिफिकेशन हा कोर्स गुगलच्या स्किल शॉपवर उपलब्ध आहे. हा कोर्स तुम्हाला Google डिस्प्ले वापरून तुमचे कौशल्य प्रमाणित करण्यात मदत करू शकतो कारण तुम्ही जाहिरातींच्या गुंतवणुकीबद्दल शिकता. यासह, तुम्ही योग्य धोरण कसे तयार करावे आणि तुमची विपणन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मोहिमे कशी चालवायची हे शिकू शकता. हा कोर्स फक्त 2.6 तासांचा आहे. गूगल Ad सर्च सर्टिफिकेशन गुगल अॅड सर्च सर्टिफिकेशनमध्ये तरुणांना गुगल सर्च आणि कीवर्डसाठी प्रशिक्षण दिले जाते. या कोर्सद्वारे, तुम्ही स्मार्ट बिडिंग आणि ऑडियंस सोल्यूशन्स यांसारख्या ऑटोमेटेड सोल्यूशन्सचा फायदा घेण्यास देखील शिकाल. हा कोर्स देखील 2.6 तासांचा आहे. Economics मध्ये करिअर करायचयं? मग ‘या’ क्षेत्रांमध्ये प्रगतीचे 100% चान्सेस

गूगल Ad App सर्टिफिकेशन

गुगल अॅड अॅप सर्टिफिकेशनद्वारे, तरुणांना गुगल अॅप कॅम्पेन तयार करण्यात कौशल्य प्राप्त होऊ शकते, जे आजच्या काळात जास्तीत जास्त व्यवसाय प्रभाव प्रदान करतात. हा कोर्स देखील फक्त 2.8 तासांचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या