JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JEE उमेदवारांनो, तुमच्या हातात आहेत अवघे 15 दिवस; वेळ घालवू नका; इथे द्या Mock Test

JEE उमेदवारांनो, तुमच्या हातात आहेत अवघे 15 दिवस; वेळ घालवू नका; इथे द्या Mock Test

तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता आणि मागील काही वर्षांतील पेपर्सही बघू शकता. तसंच JEE मध्ये लागणारे काही महत्त्वाचे फॉर्मुलेही बघू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 जून: JEE च्या पहिल्या सत्राची परीक्षा (JEE Mains Exam 2022) लवकरच होणार आहे. जेईई मेन 2022 (JEE Mains Exam 2022) परीक्षा June 20 ते 29 या कालावधीत (JEE Mains Exam dates) होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेण्यात येणार्‍या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) 2022 च्या जून सत्रासाठी प्रवेशपत्रे लवकरच जारी करण्यात येणार आहेत. पण JEE परीक्षा चांगल्या मार्कांनी पास करून उत्तम कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर त्यासाठी चांगली तयारी करणं आवश्यक आहे. 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 जून या JEE मुख्य परीक्षा 2022 च्या सत्र 1 साठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जेईई परीक्षा 2022 च्या तयारीसाठी विद्यार्थ्यांकडे जास्त वेळ शिल्लक नाही. 2022 मध्ये JEE परीक्षा प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि लिंक्स देणार आहोत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता. हा फोटो बघून तुम्हाला मिळेल तुमचा Dream Job; करिअरचं क्षेत्रही निवडता येईल Mock Test म्हणे नक्की काय? मॉक टेस्ट म्हणजेच तुम्ही देणार आहेत त्या परीक्षांसारखीच एक परीक्षा. मॉक टेस्ट ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जातात. या टेस्टमधून विद्यार्थ्यांना खऱ्या परीक्षेत उत्तरं कशी लिहावीत, कोणत्या उत्तराला किती वेळ द्यावा याबद्दल अंदाज येतो. तसंच ही परीक्षा संपूर्णतः बोर्डाच्या अभ्यासक्रमावर असते. तसंच विविध विषयांची वेगळी मॉक टेस्टही असते.

 मॉक टेस्ट देणं आवश्यक

आजकाल इंटरनेटवर प्रत्येक परीक्षेच्या मोक टेस्ट उपलब्ध असतात. म्हणजेच जी परीक्षा तुम्ही देणार आहेत त्यासंबंधीचे काही पेपर्स उपलब्ध असतात. हे पेपर्स सोडवून बघून तुम्ही JEE परीक्षा क्रॅक करू शकता. JEE Mains साठीही काही पेपर्स सोडवून बघा यामुळे तुम्हाला परीक्षेतील परतून कठीण वाटणार नाहीत.

TITLELINK
JEE Main Mock Test  https://www.topperlearning.com/jee/mock-test-start-21

या मॉक टेस्टच्या लिंक ओपन करून तुम्हाला JEE Mains च्या सर्व मॉक टेस्ट देता येतील. तसंच यामुळे तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यात मदत होईल. तसंच Toppers Learning या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना एक मॉक टेस्ट फ्री देता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या