मुंबई, 04 जून: आपला मेंदू एक अजब अवयव आहे असं समजलं जातं. ते खरंही आहे. मेंदूची रचना अत्यंत गुंतागुंतीची असते. मेंदू, त्याचं कार्य आणि आपलं आयुष्य घडवताना त्याची होणारी मदत यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवण्यात येतात. ‘द माईंड जर्नल’ (‘The Mind Journal’) अशाच काही ब्रेन टीझर्सबद्दल (Brain Teaser) माहिती दिली जाते. गेल्या महिन्यात आपण काही ऑप्टिकल इल्युजन्स (Optical Illusions) सोडवले होते आणि ब्रेन टीझर्स पाहिले होते. आता ‘द माईंड जर्नल’ (‘The Mind Journal’) मधील या नवीन ब्रेन टीझरमुळे (Brain Teaser) तुम्हाला तुमच्या स्वप्नातला जॉब मिळायला मदत होऊ शकेल. ही काही जादू नाही. तुम्ही या चित्राकडे पाहिल्यावर पहिल्याच दृष्टीक्षेपात तुम्हाला तुमची प्रतिभा आणि जगातील व्यावसायिक कौशल्य समजून घेण्यात मदत होईल. या चित्राकडे पाहिल्यास त्यात एकाच चित्रात तीन वेगवेगळ्या आकृती दिसतात. गोगलगाय (Snail), कवटी (Skull) किंवा नकाशा (Map) अशा या तीन आकृत्या आहेत. या चित्राकडे (Illustration) पाहिल्यास पाहणाऱ्याला तीनही आकृत्या दिसतात. पण त्यातील जी पहिली आकृती तुम्ही पाहू शकाल त्यावरून कोणत्या प्रकारचा जॉब तुमच्यासाठी योग्य आहे ते तुम्हाला समजेल. गोगलगाय (Snail) जर तुम्हाला या आकृतीत गोगलगाय सगळ्यांत आधी दिसली तर त्यांचा आवाज चांगला असतो. म्हणजेच आवाजाशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात ते काम करू शकतात. आवाजाची गरज भासते अशी अनेक क्षेत्रं आहेत. अशा व्यक्ती शिक्षक, बस ड्रायव्हर्स आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून उत्तम कार्य करू शकतात, असं YourTango मधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जर तुम्ही तुमचा आवाज वापरून उत्तम संवाद साधत असाल तर त्याचा तुम्हाला अनेक क्षेत्रांत उपयोग होऊ शकतो. कवटी (Skull) जे या चित्रातील कवटी बघू शकतात ते अन्य लोकांपेक्षा जास्त सर्जनशील असतात असं मानलं जातं. चित्रकार, डान्सर किंवा अन्य कोणत्याही कलेच्या क्षेत्रात असे लोक उत्तम काम करु शकतात. आपल्या क्षेत्रात आपल्या कौशल्याचा जास्तीत जास्त वापर करण्यावर त्यांनी भर द्यावा. नकाशा (Map) जे पहिल्याच दृष्टीक्षेपात नकाशा पाहू शकतात त्यांच्यामध्ये कोणत्याही समस्येवर मात करण्याची उत्तम क्षमता असते. उत्तम विश्लेषणात्मक मन असल्यामुळे ही क्षमता असल्याचं मानलं जातं. त्यांच्या मेंदूचा अगदी उच्च मर्यादेपर्यंत त्यांनी वापर केल्यास त्यांचं करिअर अत्यंत उत्तम होऊ शकतं. असे लोक त्यांच्या आयुष्यात कायम आव्हानांचा शोध घेतात आणि त्यांच्या आयुष्यात सर्वोत्तम ते मिळवू शकतात. असे लोक कायदा, आर्किटेक्चर, विज्ञान आणि इंजिनीअरिंग अशा क्षेत्रांत उत्तम करिअर करू शकतात. त्यामुळे आपल्यामध्ये काय कौशल्य आहेत आणि त्यांनी कशावर भर दिला पाहिजे. तुमच्यामधील चांगल्या गोष्टींचा लवकर अंदाज आला तर त्यादृष्टीने तुम्हाला करिअर निवडता येऊ शकेल; पण ते आतापर्यंत लक्षात आलं नसेल तर आताही खूप उशीर झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला जे आवडतं ते करा आणि त्यात प्रावीण्य मिळवा. यश नक्की मिळेलच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.