मुंबई, 30 मे: पश्चिम बंगालच्या लोकसेवा आयोगाने हॉर्टिकल्चर डायरेक्टर पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बंगाली लिहिता व बोलता येणं अनिवार्य आहे. निवडलेल्या उमेदवारांना WBS (ROPA) नियम, 2019 नुसार 1,23,100 रुपये ते 1,91,800 रुपये मासिक वेतन दिलं जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून 2023 आहे. या संदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलंय. पात्र व इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयाचा पुरावा, इतर संबंधित अनुभव सर्टिफिकेट्स आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज दिलेल्या तारखेच्या आत पाठवावा. उमेदवारांना 210 रुपये फी भरावी लागेल. पश्चिम बंगालमधील एससी, एसटी उमेदवार व 40% किंवा त्याहून अधिक शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना कोणतीही फी भरावी लागणार नाही. या साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 25 मे पासून सुरू झाली आहे. Indian Navy Agniveer Bharti: 12वी पास असाल तर नौदलात जॉबसाठी करा अर्ज; तब्बल 1365 जागांसाठी बंपर ओपनिंग्स पदांची नावं व रिक्त जागा पश्चिम बंगाल सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज व हॉर्टिकल्चरमध्ये डायरेक्टर ऑफ हॉर्टिकल्चर या पदासाठी एक जागा रिक्त आहे. पात्रता उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून हॉर्टिकल्चर विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सेकंड क्लास पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पूर्ण केलेली असावी. उमेदवाराला बंगाली लिहिता व बोलता यायला हवं. वयोमर्यादा 27 मे 2023 रोजी उमेदवारांचं वय 30 ते 40 वर्षांदरम्यान असावं. किमान 40% अपंगत्व असलेल्या व्यक्तींना वयोमर्यादेत शिथिलता असेल. वेतन उमेदवारांना 7 व्या CPC नुसार पे मॅट्रिक्समध्ये लेव्हल 7 वर मासिक पगार दिला जाईल. महिन्याचा तब्बल 1,32,300 रुपये पगार अन् पात्रता फक्त 7वी-10वी; राज्याच्या या विभागात सरकारी नोकरी; करा अप्लाय परीक्षेसाठी सूचना परीक्षार्थींनी मोबाईल फोन, ब्लूटूथ डिव्हाइस, स्मार्ट वॉच किंवा इतर कम्युनिकेशन डिव्हायसेस अशा प्रतिबंधित वस्तू आणू नयेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. या सूचनेचं कोणतंही उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्यानुसार या जाहिरातीशी संबंधित परीक्षा तसंच त्यानंतरच्या परीक्षांमधून उमेदवाराला अपात्रही ठरवलं जाऊ शकतं. जॉब हवाय ना? मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे करा अप्लाय अर्ज कसा करायचा इच्छुक उमेदवारांनी 15 जून 2023 पर्यंत अधिकृत पोर्टलवरून अर्ज करावेत. शैक्षणिक पात्रता, वयाचा पुरावा, इतर संबंधित अनुभव सर्टिफिकेट्स आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज दिलेल्या तारखेच्या आत पाठवावा. उमेदवारांना 210 रुपये फी भरावी लागेल. पश्चिम बंगालमधील एससी, एसटी उमेदवार व 40% किंवा त्याहून अधिक शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना कोणतीही फी भरावी लागणार नाही. उमेदवारांची निवड पात्रता, हायर ग्रेड्स, गुण स्क्रीनिंग चाचणीच्या आधारे केली जाईल.