JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Google च्या Interview मध्ये विचारले जातात 'हे' भयंकर प्रश्न; वाचून तुम्हीही व्हाल हँग

Google च्या Interview मध्ये विचारले जातात 'हे' भयंकर प्रश्न; वाचून तुम्हीही व्हाल हँग

तुम्हालाही Google सारखया मोठ्या कंपनीत जॉब हवा असेल तर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं रेडी ठेवणं आवश्यक असणार आहे.

जाहिरात

Interview मध्ये विचारले जातात 'हे' भयंकर प्रश्न

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 सप्टेंबर: सध्या सर्वच IT कंपन्या फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यात आघाडीवर आहेत. त्यात IT क्षेत्राची प्रचंड गतीनं प्रगती होत आहे. म्हणूच अनेक IT कंपन्यांनी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचा आणि जगभरातील शहरांमध्ये आपली व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मग यात Google सारखी नामांकित आणि सर्वात मोठी कंपनी मागे कशी असेल Google नं भारतात आपल्या कंपनीची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देणार आहे. पण तुम्हालाही Google सारखया मोठ्या कंपनीत जॉब हवा असेल तर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं रेडी ठेवणं आवश्यक असणार आहे. Google, Apple, Meta, किंवा इतर सारख्या मोठ्या टेक कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याचं प्रत्येक नवीन व्यक्तीचं स्वप्न असतं आणि सोबत करिअरची सुरुवात Google सारख्या मोठ्या कंपनीतूनकेळी तर उत्तमच. म्हणूनच आम्ही Google मध्ये मुलाखतीच्या वेळी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची यादी तयार केली आहे. चला तर मग जाणून घेऊया. UPSC ESE: इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षा एका झटक्यात होईल क्रॅक; फक्त असा करा अभ्यास हे आहेत काही कॉमन प्रश्न  तुमची आवडती प्रोग्रामिंग भाषा कोणती आहे? आणि तुम्हाला त्या प्रोग्रामिंग भाषेबद्दल काय आवडत नाही? तुमचे आवडते Google प्रोडक्ट कोणते आहे आणि का? मायक्रोसॉफ्ट आणि Apple पेक्षा तुम्ही Google ला अप्लाय का केलंत? Java मध्ये हॅशकोड() पद्धत का वापरली जाते? लिनक्स व्हर्च्युअल मेमरी बद्दल माहिती द्या. प्रोजेक्टमध्ये सोडवण्यासाठी सर्वात कठीण बग कोणता होता आणि तुम्ही तो कसा सोडवला?

तुम्ही YouTube सारखे प्रोडक्ट कसे तयार कराल? शेअर करण्यासाठी काही कल्पना आहेत? हे आणि याशिवाय अनेक सायन्स, मॅथ्स आणि इतर विशयनशी निगडित प्रश्न Google च्या मौलखतीत विचारले जाऊ शकतात. म्हून जर तुम्हाला कधी Google मध्ये नोकरी करण्याचा चान्स मिळाला तर त्याआधी मुलाखतीला जाताना या प्रश्नांची उत्तरं नक्की वाचून जा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या