बिहारच्या मुलीला गुगलमध्ये नोकरी
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: स्वप्न सगळेच पाहतात, पण ती सत्यात उतरवण्याची जिद्द फार थोड्या लोकांमध्ये असते. स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी दररोज लाखो लोक मुलखती (Job Interview Tips) देतात. अनेकांना पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळते. तर काही जणांना फार खस्ता खाव्या लागतात. पण, जर ध्येय निश्चित असेल आणि ते प्राप्त करण्याची जिद्द असेल तर काहीच कठिण नाही. ध्येय (How to get success) गाठताना तुम्ही कितीदा अडकलात आणि तुमच्या पदरी अपयश आले, तरी त्याने काहीच फरक पडत नाही. पण हार न मानता सतत ध्येयाचा पाठपुरावा केला तर स्वप्ने नक्कीच साकार होतात. हे सिद्ध केले आहे, बिहारच्या पाटणा शहरातील एका 24 वर्षीय संप्रीति यादव (Sampriti Yadav) या तरुणीने. संप्रीति यादव ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या संप्रीति यादवला (Software Engineer Sampriti Yadav) गुगलमध्ये (Google) 1.10 कोटी रुपये पगाराची नोकरी (How to get job in Google) मिळाली आहे. पण ही नोकरी मिळवण्यासाठी तिला अपार प्रयत्न करावे लागले आहेत. नोकरी मिळवण्यासाठी ती जवळपास 50 वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतींना सामोरी गेली होती. आपला अनुभव तिने शेअर केला आहे. मुलाखती दरम्यान मला नर्व्हस वाटायचं. चांगले काम करण्यासाठी माझे आई-वडील आणि जवळच्या मित्रांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं. मोठ्या-मोठ्या कंपन्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी अनेक तास घालवले. मोठ्या कंपन्यामध्ये मुलाखती या सहसा चर्चा स्वरूपात असतात. सतत अभ्यास करून आणि पूर्ण आत्मविश्वासाने मुलाखत दिल्यास त्यात यश मिळते, असे तिने सांगितले. तुम्हालाही पर्मनंट Work From Home हवंय? कुठे आणि कसा शोधाल Job; जाणून घ्या मेहनत घेतल्यावर यश पदरी पडते, हे संप्रीति यादवच्या प्रवासावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ती म्हणाली, प्रत्येक प्रयत्न हा पूर्ण मेहनतीने आणि इमानदारीने करावा. तसेच मुलाखतीमध्ये अपयशी होणे देखील महत्त्वाचे आहे. कारण, अपयश हे व्यक्तीला अधिक मेहनत करण्यास प्रवृत्त करते. तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल, तितके चांगले दिर्घकालीन परिणाम तुम्हाला मिळतील, असे ती म्हणाली. लंडनमधील गुगलच्या ऑफिसमध्ये काम करण्याची संधी, ही माझ्यासाठी पॅकेजपेक्षाही सर्वांत मोठी गोष्ट होती. पॅकेज संदर्भातील माहिती तर नंतर मिळाली. मुलाखत पास केल्याचे कळल्यानंतर माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कोणत्याही मोठ्या टेक फर्मशी जोडलं जाणं, हे प्रत्येक सॉफ्टवेअर इंजिनिअरचं स्वप्न असतं. गुगलमध्ये नोकरी आणि तेही लंडनमध्ये काम करणार, हीच भावना माझ्यासाठी खूप भारी होती. वैयक्तिकरित्या, यामुळे माझ्या आत्मविश्वासात भर पडली आहे, असे तीने सांगितले. संप्रीति यादवने पाटणा येथील नॉट्रे डेम अकादमीमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तर मे 2021 मध्ये दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातून बीटेक पूर्ण केले आहे. संप्रीतीचे वडील रामशंकर यादव हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहेत. तर आई शशी प्रभा या बिहार सरकारच्या नियोजन आणि विकास विभागात सहाय्यक संचालक पदावर आहेत. आपले प्रेरणा स्रोत हे आई-वडील असल्याचे तीने सांगितले. तिच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा आई-वडीलांकडून मिळाली. मी लहानपणापासून माझ्या आई-वडिलांनी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. माझी आईने अनेक परीक्षा दिल्या. त्यात त्याल अपयश मिळाले. पण, ती कधीच खचली नाही. माझ्या आई-वडिलांना पाहूनच मी वागले. तसेच याशिवाय, माझ्या मित्रांकडूनदेखील मी प्रेरणा घेते. कारण, प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते, असा माझा विश्वास आहे, असे ती म्हणाली. Career Tips: सोशल मीडिया बनू शकतं तुमच्या कमाईचं साधन; फक्त हे ठेवा लक्षात तुम्हालाही स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला कडी मेहनत घ्यावी लागेल. यश गाठण्यासाठी पहिल्यांदा रिजेक्टेड ई-मेल, अपयशी मुलाखती, कुटुंब, दबाव आणि निराशेपासून स्वत:ची मुक्तता करून घ्यावी लागेल आणि मोकळेपणाने अभ्यास आणि स्वतःवर विश्वास ठेवून काम करावे लागेल. कारण, प्रयत्नाने यश नक्कीच प्राप्त होते.