JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Flipkart Jobs: वर्क फ्रॉम होम करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फ्लिपकार्ट करणार मोठी भरती

Flipkart Jobs: वर्क फ्रॉम होम करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फ्लिपकार्ट करणार मोठी भरती

या जॉब अलर्टचा फायदा असा आहे की पात्र उमेदवारांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाईल. Flipkart ने अनुभवी उमेदवारांकडून तसेच फ्रेशर्सकडून अर्ज मागवले आहेत.

जाहिरात

वर्क फ्रॉम होम jobs

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 सप्टेंबर:  देशातील टॉप ई- कॉमर्स कंपनी Flipkart लवकरच फ्रेशर्स आणि प्रोफेशनल उमेदवारांसाठी मोठी भरती करणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. ई-रिटेलर कंपनीने रिक्त पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या जॉब अलर्टचा फायदा असा आहे की पात्र उमेदवारांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाईल. Flipkart ने अनुभवी उमेदवारांकडून तसेच फ्रेशर्सकडून अर्ज मागवले आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी फ्लिपकार्ट देशव्यापी भरती मोहीम राबवणार आहे. नोकऱ्यांबद्दल अधिक माहिती कंपनीच्या लिंक्डइन पृष्ठावरूनपेजवरून किंवा फ्लिपकार्ट करिअर साइटवरून उमेदवारांना मिळू शकणार आहे. कोरोनाने जगभरातील कामाच्या ठिकाणांची गतिशीलता बदलली आहे. त्यामुळे केवळ खाजगी कंपन्याच नाही तर सरकारी ऑफिसेस देखील तात्पुरत्या स्वरुपात असली तरी वर्क फ्रॉम होम मॉडेलकडे वळली आहेत. या अनुषंगानं, फ्लिपकार्टनं देखील नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा असेल असं जाहीर केलं आहे. कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; रिझर्व्ह बँकेत थेट 69,000 रुपये पगाराची नोकरी; आताच करा अप्लाय Flipkart दिल्ली, कर्नाटक, बिहार आणि इतर प्रदेशांमध्ये WFH मॉडेलसह विविध भूमिकांसाठी भरती करत आहे. ई-रिटेलर कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल. भरती प्रक्रिया व्हर्च्युअल पद्धतीने केली जाईल म्हणजेच मुलाखती ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येतील. Flipkart ने सांगितले की त्यांची कंपनी नेहमीच योग्य लोकांच्या शोधात असते आणि पात्र लोकांची दखल घेतली जाते. ग्राहक हे त्यांचे पहिले प्राधान्य असून त्यांची उत्पादने आणि सेवा या तत्त्वावर आधारित असतील. लोकांच्या कलागुणांना कामाच्या ठिकाणी आणखी वाढवता येते आणि मजबूत नेतृत्वगुण असलेले लोक संस्थेत प्रगती करू शकतात, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.

कंपनीच्या धोरणानुसार, प्रतिनिधींना अधिक चांगली संधी दिली जाईल जेणेकरून ते कामात नावीन्य आणू शकतील. निवेदनात म्हटले आहे की कंपनीच्या कर्मचार्‍यांना अशा प्रकारे काम करावे लागेल की कंपनी स्पर्धात्मक आणि बाजारातील परिस्थितीशी सुसंगत राहू शकेल. त्यामुळे फ्लिपकार्टमध्ये नॊक्ररीची सुवर्णसंधी फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या