JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Engineer's Day 2022: 'या' आहेत देशातील काही अद्भुत वास्तू; ज्या बघून तुम्हीही म्हणाल 'वाह इंजिनिअर्स वाह'

Engineer's Day 2022: 'या' आहेत देशातील काही अद्भुत वास्तू; ज्या बघून तुम्हीही म्हणाल 'वाह इंजिनिअर्स वाह'

आज आम्ही तुम्हाला देशातील अशा काही इंजिनिअर्सनं घडवून आणलेल्या चमत्कारांबद्दल सांगणार आहोत जे बघून तुम्हीही म्हणाल ‘वाह इंजिनिअर्स वाह’ काय कमाल केलीये

जाहिरात

देशातील काही अद्भुत वास्तू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 सप्टेंबर: सिव्हिल इंजिनिअर आणि भारतरत्न पुरस्कारप्राप्त सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस 15 सप्टेंबर रोजी भारतात इंजिनिअर्स डे म्हणून साजरा केला जातो . सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस पाळला जातो. याच निमित्यानं देशातील काही होतकरू इंजिनिअर्सचं कौतुकही केलं जातं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला देशातील अशा काही इंजिनिअर्सनं घडवून आणलेल्या चमत्कारांबद्दल सांगणार आहोत जे बघून तुम्हीही म्हणाल ‘वाह इंजिनिअर्स वाह’ काय कमाल केलीये. चला तर मग जाणून घेऊया. अलिकडच्या वर्षांत, भारताने सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये टेक्नॉलॉजिकली बरीच प्रगती केली आहे. त्यामुळेच देशात शक्य होणार नाही असं वाटत असलेली प्रोजेक्ट्सही होऊ लागले आहेत. याच प्रगतीसाठी जबाबदार असलेल्या इंजिनिअर्समुळे देशाकडे आता ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांसह अनेक अभियांत्रिकी चमत्कार आहेत. अलीकडीचा काही इंजिनीअरिंगच्या काही चमत्कारांवर एक नजर टाकूया. वांद्रे-वरळी सी लिंक, मुंबई वांद्रे-वरळी सी लिंक मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे दक्षिणेकडील वरळीला जोडते. या पुलाचे बांधकाम हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी (HCC) ने केले होते. याची कल्पना 1990 च्या दशकात झाली आणि जुलै 2009 मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला. आठ लेनचा पूल मार्च 2010 मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाला. बरेच लोक आजही या पुलावरून जाताना आपण भारतात नाहीच असं म्हणतात. त्यामुळे हा पूल बांधणाऱ्या इंजिनिअर्सना सलाम. गोल्डन चान्स! कोणतीही परीक्षा नाही थेट 1,50,000 रुपये महिना पगार; ‘या’ महापालिकेत मोठी भरती अटल बोगदा, हिमाचल प्रदेश अटल बोगदा हा 10,000 फूट उंचीवरील जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे जो मनालीला लाहौल-स्पिती व्हॅलीशी जोडतो. 9.02 किलोमीटरचा हा बोगदा रोहतांग खिंडीखाली आहे आणि तो मनाली-लेह महामार्गावर बांधला गेला आहे. हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) द्वारे बांधले गेले आहे आणि ऑक्टोबर 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे जो 182 मीटर उंचीवर आहे. हे यूएसए मधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे आणि भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचे चित्रण आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीची रचना पद्मभूषण पुरस्कारप्राप्त शिल्पकार राम व्ही सुतार यांनी केली आहे. त्याचे बांधकाम सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो यांनी केले आहे. पुतळ्याचे कांस्य आच्छादन Jiangxi Toqine कंपनी नावाच्या चिनी फाउंड्रीने केले होते.

पंबन ब्रिज, तामिळनाडू पंबन ब्रिज हा भारतातील पहिला सागरी पूल आहे जो रामेश्वरम बेटाला मुख्य भूभागाशी जोडतो. 2 किमी लांबीसह, ते 1914 मध्ये कार्यान्वित झाले आणि आता 100 वर्षांहून अधिक जुने आहे. ब्रिटीशांनी पुलाचे बांधकाम हाती घेतले असताना पांबन पुलाच्या मध्यवर्ती भागाची रचना जर्मन अभियंता शेर्झर यांनी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या