JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Study Abroad: परदेशात शिक्षण घेणं अजिबात कठीण नाही; फक्त जाण्याआधी 'या' गोष्टी करायला विसरू नका

Study Abroad: परदेशात शिक्षण घेणं अजिबात कठीण नाही; फक्त जाण्याआधी 'या' गोष्टी करायला विसरू नका

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला परदेशात शिक्षणाचे फायदे समजतील. चला तर जाणून घेऊया.

जाहिरात

परदेशात UG कोर्ससाठी IMP टिप्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जून: दरवर्षी हजारो विद्यार्थी बारावीनंतर परदेशी महाविद्यालयांमध्ये यूजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी अर्ज करतात, परंतु त्यापैकी काहींनाच यश मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे अर्ज योग्य पद्धतीने न भरणे. परदेशात शिक्षण घेणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. याद्वारे देश-विदेशात नोकऱ्या आणि करिअर निर्माण करणे सोपे असतानाच इतर देशांतील लोकांशी ताळमेळ साधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्वही योग्य पद्धतीने विकसित होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला परदेशात शिक्षणाचे फायदे समजतील. चला तर जाणून घेऊया. कॉलेज शॉर्टलिस्ट करा ज्या कॉलेजेस तुम्हाला UG कोर्ससाठी अर्ज करायचा आहे त्यांची शॉर्टलिस्ट करा, त्यानंतर त्या कॉलेजची ऑनलाइन माहिती मिळवा. याशिवाय तिथे आधीच शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल जाणून घ्या आणि त्यांच्याशी बोला, आजच्या काळात ते सोशल मीडियामुळे सोपे झाले आहे. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. आधी 10वी की 12वी? कधी लागणार CBSE चा निकाल? मोठी अपडेट आली समोर

चांगले मार्क्स मिळवा

परदेशातील कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी मागील शैक्षणिक परीक्षेत चांगले गुण असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या सर्व सेमिस्टरमध्ये चांगले गुण मिळाले पाहिजेत जेणेकरून तुम्ही गुणवंत विद्यार्थी असल्याचा दावा करू शकता. याशिवाय तुम्हाला TOEFL, IELTS, SAT आणि ACT सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवावे लागतील. अशा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी तुम्ही कोचिंग इन्स्टिट्यूटची मदत घेऊ शकता. अर्ज भरणे परदेशात प्रवेश घेण्याची पहिली पायरी म्हणजे तुमचा अर्ज. त्यामुळे कोणतीही चूक न करता तुमचा अर्ज योग्यरित्या भरा. यामध्ये वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती द्यावी लागेल. त्यात दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारेच ते भरा. थांबा.. थांबा… मनात आलं म्हणून लगेच Resign करू नका; आधी ‘या’ गोष्टी वाचा

स्वतःबद्दल माहिती द्या

फॉर्म भरताना, कोर्स निवडण्याचे मुख्य कारण आणि तुमच्या वैयक्तिक अनुभवांची माहिती देणे हा अर्ज प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या आधारावर तुम्ही इतर उमेदवारांपेक्षा वेगळे असल्याचे सिद्ध करू शकता. हे लिहिताना तुम्ही तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी तुम्ही तुमचे शिक्षक, मित्र आणि नातेवाईक यांची मदत घेऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या