मुंबई: DRDO Recruitment 2023: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) कंत्राटी नोकरीसाठी कन्सल्टंट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. DRDO Recruitment 2023 च्या अधिकृत नोटिफिकेननुसार, फक्त 1 जागा रिक्त असून निवडलेल्या उमेदवाराची 1 वर्षासाठी नियुक्ती केली जाईल. यासंदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलंय. DRDO रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, वर नमूद केलेल्या नोकरीच्या पोस्टसाठी अर्ज करणारे उमेदवार 63 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत. निवडलेल्या उमेदवाराला पे स्केल 14 नुसार मासिक पगार मिळेल.
75,000 रुपये पगार आणि कोणतीच परीक्षा नाही; ‘या’ महापालिकेत थेट मिळणार नोकरी; ही घ्या मुलाखतीची तारीखइच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचे रितसर भरलेले अर्ज सर्व संबंधित कागदपत्रांसह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावे लागतील. हे अर्ज 2 मे 2023 रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचले पाहिजेत. अपूर्ण अर्ज किंवा शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
पदाचं नाव आणि रिक्त जागा कन्सल्टंट पदासाठी एक रिक्त जागा भरली जाणार आहे.
IT क्षेत्रात करिअर करायचंय? मग Dell कंपनीत ‘या’ पदांसाठी होतेय भरती; करा अप्लायअनुभव उमेदवार हा ऑफिसर असावा. तो राज्य सरकार, केंद्र सरकार PSUs, स्वायत्त संस्था, विद्यापीठं, सरकारच्या R&D ऑर्गनायझेशनमधून अधिकारी पदावरून रिटायर झालेला असावा. ज्या पदासाठी उमेदवार अर्ज करत आहे, त्यातलं प्रॅक्टिकल नॉलेज व अनुभव त्याला असावा. DRDO मध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना निवड/नियुक्ती दरम्यान प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराचं लेखी व तोंडी कम्युनिकेशन स्कील उत्तम असावं. वयोमर्यादा वर नमूद केलेल्या नोकरीच्या पोस्टसाठी अर्ज करणारे उमेदवार 63 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत. वेतन निवडलेल्या उमेदवाराला पे स्केल 14 नुसार मासिक वेतन मिळेल. ते 260000 रुपयांपर्यंत असेल. नोकरीचा कालावधी निवडलेल्या उमेदवाराची नियुक्ती 1 वर्षांच्या कार्यकाळासाठी केली जाईल, ती वाढवली जाऊ शकते. अर्ज कसा करायचा इच्छुक आणि पात्र उमेदवारांना शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सर्व संबंधित कागदपत्रांसह योग्यरित्या भरलेला अर्ज पाठवावा लागेल. इतर कोणत्याही पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज पाठवण्यासाठी पत्ता डायरेक्टर, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लेबोरेटरी, (DRDL), गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, संरक्षण मंत्रालय, DRDO, डॉ. एपीजे अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स, कांचनबाग पीओ, हैदराबाद, तेलंगणा – 500 058, फोन क्रमांक 040-24583017 इच्छुक व पात्र उमेदवार 2 मे 2023 च्या आधी या पत्त्यावर अर्ज करू शकतात.