नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना एका अटीचं पालन करावं लागणार आहे
मुंबई, 22 एप्रिल: 25 एप्रिलपासून ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षा (ICSE Semester 2 exam 2022) सुरु होणार आहेत. यासाठीचे हॉल तिकीट (ICSE semester 2 exam 2022 hall ticket) विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. परीक्षेसाठीची नियमावली (CISCE Exam 2022 Guidelines) या आधीच बोर्डाकडून जारी करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काय अटी असतील त्यांचं पालन कशाप्रकारे नक्की कशाप्रकारे करावं याबाबत यात माहिती देण्यात आली आहे. मात्र याच नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना एका अटीचं पालन करावं लागणार आहे. जर हे अट पाळण्यात आली नाही तर परीक्षेला बसता येणार नाही असं सांगण्यात आलं आहे. मात्र याच अटीमुळे आता विद्यार्थी संभ्रमात आहेत. जानेवारी महिन्यात ICSE आणि ISC बोर्डाकडून परीक्षेसंदर्भातील नियमावली जारी करण्यात आली होती. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा विद्यार्थ्यांनाच परीक्षेला बसता येणार अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र अजूनही काही विद्यार्थ्यांनी लस घेतलेली नाही त्यामुळे अशा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्मण झाला आहे. टाय ब्रेकर सिस्टम नक्की आहे काय? ज्या पद्धतीनं NEET, JEE मध्ये ठरेल Topper हा विषय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पोहोचला असता , “ISCE बोर्डचे काही विद्यार्थी आपल्याकडे आले. या आधी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक अॅफिडेव्हिट दाखल केलं होतं, त्यामध्ये परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना कोरोना लस बंधनकारक नसेल असं स्पष्ट केलं होतं. पण तरीही CISCE ने या प्रकारची वेगळी भूमिका घेतली आहे.” .असं त्यांनी म्हंटलं आहे. तसंच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून संबंधित बोर्डाला आधीच संपर्क साधण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. बोर्डाला केली विनंती “कोरोनाची लस घेणं हे आरोग्यासाठी महत्त्वाचं असलं, त्यामुळे जीवाची शाश्वती असली तरी ही लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याची भूमिका ही भेदभाव करणारी आहे. त्यामुळे देशाच्या शिक्षणमंत्र्यांना आणि CISCE बोर्डला माझी विनंती आहे की या प्रकरणी लक्ष घालावं आणि तात्काळ स्पष्टीकरण द्यावं.” अशी विनंतीही राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संबंधित बोर्डाला केली आहे.