JOIN US
मराठी बातम्या / करिअर / 11th Admissions: अखेर प्रश्न सुटला! CBSE निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु; असा असेल दुसरा टप्पा

11th Admissions: अखेर प्रश्न सुटला! CBSE निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु; असा असेल दुसरा टप्पा

दहावीचा निकाल (Class 10 Results) जाहीर झाल्यानंतर या अर्जाचा दुसरा टप्पा म्हणजेच भाग-II भरता येणार होता. आता CBSE चे निकालही जाहीर झाले आहेत त्यामुळे आता प्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे.

जाहिरात

11वी प्रवेश झाले सुरु

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जुलै: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यात अकरावी प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया (Class 11th Online Admission process) सुरू करण्यात आली आहे. यंदा ही प्रवेश प्रक्रया दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच निकालाआधी विद्यार्थ्यांना त्यांची माहिती भरून नोंदणी करायची आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणेजच भाग-I 30 मे पासून सुरू झाला आहे. या तारखेपासून 11 वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी (Class 11th Online Admission) सुरू करू शकत होते. तसेच दहावीचा निकाल (Class 10 Results) जाहीर झाल्यानंतर या अर्जाचा दुसरा टप्पा म्हणजेच भाग-II भरता येणार होता. आता CBSE चे निकालही जाहीर झाले आहेत त्यामुळे आता प्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे. गड्यांनो, कम्प्युटरवर टायपिंग येतंय ना? मग हा जॉब तुमचाच; पुणे महापालिकेत 200 Vacancy; ही घ्या लिंक पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली माहिती भरली होती. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि गुणपत्रिका अपलोड करायची आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. यंदा CBSE चा निकाल अधिक लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पर्धा बघायला मिळणार आहे. CGST आणि Central Excise विभाग राज्यात करणार भरती; ‘ही’ पात्रता असेल तर तुम्हीही होऊ शकता ऑफिसर असा असेल प्रवेशाचा दुसरा टप्पा संबंधित अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना जिथे त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा महाविद्यालयांची प्राधान्य यादी द्यावी लागेल. या प्राधान्य फॉर्ममध्ये किमान एक आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांची नावे भरता येतील. विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या