CBSE Results 2022
मुंबई, 04 जुलै: राज्य मंडळाने 10 वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आणि पुढच्या वर्गातल्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. परंतु ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ने (CBSE Term 2 result 2022) अद्याप निकाल जाहीर केले नाहीत. सीबीएसईकडून लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित होतं. त्यानुसार आता CBSE चा दहावीचा निकाल (CBSE Result 2022) हा उद्या म्हणजेच 04 जुलैला जाहीर होणार असं सांगण्यात येत होतं. मात्र आजही अजून CBSE चा निकाल जांघिर झाला नाही. मात्र आता नक्की कधी निकाल (CBSE Results 2022 date) लागणार असे प्रश्न विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडू लागले आहेत. याबद्दलची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) या महिन्यात आणि याच आठवड्यात इयत्ता 10वी टर्म 2 च्या परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते, तर 12वीचा निकाल 2022 जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 10 जुलैपर्यंत जाहीर केला जाईल. CBSE सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इयत्ता 10वीचा निकाल जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल, पुढच्या महिन्यात 12वीचा निकाल 2022 ला अपेक्षित आहे. CBSE नं लाँच केलं नवीन ‘परीक्षा संगम’ पोर्टल; इथेच बघता येणार यंदाचा निकाल आता 30:70 चा फॉर्मुला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन्ही टर्मचा निकाल 50:50 मार्किंग योजनेच्या आधारे लावण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर त्याचे प्रमाण बदलून 30:70 झाले. वास्तविक, सीबीएसई बोर्डाची टर्म 1 परीक्षा होम सेंटरवर घेण्यात आली होती. यामध्ये परीक्षेदरम्यान अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना अनैतिक कृत्यांमध्ये मदत केल्याच्या तक्रारी होत्या. अशा स्थितीत बोर्डाने टर्म 1 ची टक्केवारी कमी करण्याचा निर्णय घेतला. कागदपत्र हरवल्यास काय कराल सीबीएसई बोर्डाचे कोणतेही दस्तऐवज हरवल्यास, त्याची दुसरी प्रत मिळविण्यासाठी बोर्डाच्या www.cbse.gov.in या पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा आहे. जर कागदपत्र हरवले असेल तर तुम्ही सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करून तुमची समस्या नोंदवू शकता. CBSE बोर्ड स्वतः पडताळणी करेल आणि कागदपत्रांची एक प्रत तुमच्या पत्त्यावर पाठवेल. नोकरीची मोठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता तब्बल 80,000 रुपये पगाराची नोकरी
असा चेक करा तुमचा निकाल
अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in, cbseresults.nic.in ला भेट द्या CBSE 10वी निकाल 2022 लिंक वर क्लिक करा लॉगिन क्रेडेंशियल रोल नंबर, जन्मतारीख प्रविष्ट करा CBSE 10वीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल दहावीचे स्कोअरकार्ड डाउनलोड करा, प्रिंट काढा