सीबीएसई 12 वी निकाल
दिल्ली, 12 मे : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 12 वी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 87.33 टक्के इतकं आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे पास होण्याचं प्रमाण 6 टक्के जास्त आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यासाठी cbse.gov.in , cbseresults.nic.in संकेतस्थळावर जाऊन निकाल चेक करता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याना त्यांचा बैठक क्रमांक द्यावा लागेल.
मार्कशीट डिजीलॉकरमध्ये गेल्या काही वर्षांपासून सीबीएसई 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल खाते उघडत आहे. ज्यामध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मार्कशीट उपलब्ध करून दिली जाते. खाते सुरक्षित ठेवण्यासाठी 6 अंकी पिन वापरला जातो. बोर्डाने या पिनचा तपशील शाळांना पाठवला आहे आणि शाळांना तो डाउनलोड करून प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षितपणे उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.