JOIN US
मराठी बातम्या / करिअर / मोठी बातमी! 2023 ला 'या' तारखेपासून सुरु होणार CBSE 12वीची परीक्षा; असं असेल Exam Pattern

मोठी बातमी! 2023 ला 'या' तारखेपासून सुरु होणार CBSE 12वीची परीक्षा; असं असेल Exam Pattern

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्यामुळे निकालही लवकरच जाहीर होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ही महत्वाची बातमी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जुलै: CBSE 12वी निकाल 2022 नंतर, 10वीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.मात्र 10वीच्या निकालापूर्वी, सीबीएसईने पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये परीक्षा कधी सुरू होतील याबद्दल माहिती दिली आहे. CBSE ने सांगितले की, 2023 (CBSE 12th Exam 2023 Dates) मध्ये 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होतील. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्यामुळे निकालही लवकरच जाहीर होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ही महत्वाची बातमी आहे. कसं असेल CBSE 2023 परीक्षेचं पॅटर्न सेंट्रल कौन्सिल ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने सत्र 2022-23 साठी बोर्ड परीक्षांचा नमुना जाहीर केला आहे. पॅटर्ननुसार बोर्डाच्या परीक्षेत तेच विद्यार्थी पुढे असतील, जे रटाळ न करता समजून घेऊन अभ्यास करतील. यावेळी ऐच्छिक प्रश्न 50 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहेत. पॅटर्नमध्ये एकूण 30% पर्यायी प्रश्न कमी करण्यात आले आहेत. CBSE 12th Results Live: परीक्षेत अपयश आलं? खचू नका; ‘या’ तारखेपासून कंपार्टमेंट परीक्षा होणार सुरु असं असू शकतं पेपर पॅटर्न सत्र 2022-23 मध्ये, इयत्ता 9 ते 12 च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन विद्यार्थ्याच्या आकलनावर, सक्षमतेवर आधारित शिक्षणावर केंद्रित असेल. नवीन सत्राच्या परीक्षांमध्ये गुणवत्तेवर आधारित प्रश्नांची संख्या १० टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. यासंदर्भात मंडळाने सर्व मुख्याध्यापकांना परिपत्रक जारी केले आहे. 2021-22 च्या परीक्षेत 50% पर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. जे आगामी परीक्षांमध्ये 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षांसोबतच इयत्ता 9वी आणि 11वीच्या वार्षिक परीक्षाही त्याच प्रश्नपत्रिकेवर होतील. अंतर्गत मूल्यांकनात कोणताही बदल झालेला नाही. CBSE 2022 निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE ने इयत्ता 12वी साठी CBSE निकाल 2022 (CBSE 12th Result 2022) प्रसिद्ध केला आहे. CBSE 12वीचा निकाल 2022 आता results.cbse.nic.in, cbse.gov.in वर ऑनलाइन तपासता येईल. यासोबतच विद्यार्थ्यांना डिजिलॉकरवरही त्यांचा निकाल पाहता येणार आहे. CBSE बारावीचे निकाल सध्या परिक्षा संगमवर अपलोड केले आहेत. यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.71 टक्के आहे.तर यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या