मुंबई, 22 जुलै: गेल्या कित्येक दिवसांपासून CBSEचे विद्यार्थी ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण अखेर आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE ने इयत्ता 12वी साठी CBSE निकाल 2022 (CBSE 12th Result 2022) प्रसिद्ध केला आहे. CBSE 12वीचा निकाल 2022 आता results.cbse.nic.in, cbse.gov.in वर ऑनलाइन तपासता येईल. यासोबतच विद्यार्थ्यांना डिजिलॉकरवरही त्यांचा निकाल पाहता येणार आहे. CBSE बारावीचे निकाल सध्या परिक्षा संगमवर अपलोड केले आहेत. यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.71 टक्के आहे. मात्र काही विद्यार्थी अपयशी ठरले आहेत. पण आता खचून जाऊ नका. तुमच्यासाठी बोर्डातर्फे लवकरच कंपार्टमेंट परीक्षा घेण्यात येणार आहेत. एकूण 67743 विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. सीबीएसईने या विद्यार्थ्यांना टर्म 2 च्या परीक्षा द्याव्या लागतील अशी माहिती दिली आहे. बोर्डाने टर्म 2 च्या परीक्षेला 70% आणि टर्म 1 ला उर्वरित 30% वेटेज दिले आहे. CBSE 12th Result 2022: अखेर प्रतीक्षा संपली; CBSE12वीचा निकाल जाहीर; असा लगेच बघा तुमचा Result CBSE 23 ऑगस्टपासून कंपार्टमेंट परीक्षा घेणार आहे. बोर्डाने आता विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालावर नाराजी असल्यास शाळांना कळवण्यास सांगितले आहे. 67743 विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट श्रेणीमध्ये आधीच स्थान देण्यात आले आहे. जर विद्यार्थी त्यांच्या निकालांवर नाराज असतील तर ते कंपार्टमेंट परीक्षा देऊ शकतात किंवा त्यांच्या उत्तर लिपी पुन्हा तपासण्यासाठी अर्ज करू शकतात. रिचेकिंगला देता येतील पेपर्स विद्यार्थी त्यांच्या निकालांवर खूश नसतील तर ते त्यांच्या विशिष्ट किंवा अनेक विषयांच्या उत्तरपत्रिका पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी या विभागात पाठवू शकतात. पुढे, सीबीएसईने कंपार्टमेंट परीक्षांचा पर्याय प्रदान केला आहे, ज्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. जे विद्यार्थी त्यांच्या गुणांवर खूश नाहीत किंवा 12वी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाले आहेत ते या परीक्षांना बसू शकतात. CBSE Results Live: आज दुपारी 2 वाजता लागणार CBSE 10वीचा निकाल? समोर आली मोठी अपडेट पास होण्यासाठी इतके मार्क्स आवश्यक उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना एकूण 33% गुण मिळणे आवश्यक आहे. याचा अर्थ, विद्यार्थ्यांना प्रत्येक टर्म स्वतंत्रपणे पास करण्याची गरज नाही तर एकत्रितपणे. ज्यांना ते मिळाले नाही त्यांना कंपार्टमेंटल परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. CBSE 12वीच्या निकालात 4.72% विद्यार्थ्यांना कंपार्टमेंटला बसावे लागले आहे. उत्तीर्णतेची टक्केवारी 92.71% आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.