JOIN US
मराठी बातम्या / करिअर / काय सांगता! CBSE बोर्डाच्या Topper ची उत्तरपत्रिका वेबसाईटवर अपलोड केली जाणार? जाणून घ्या सत्य

काय सांगता! CBSE बोर्डाच्या Topper ची उत्तरपत्रिका वेबसाईटवर अपलोड केली जाणार? जाणून घ्या सत्य

CBSE बोर्डाने तो शाळांना पाठवून सर्वांना आश्चर्यचकित केले. CBSE टर्म 1 आणि टर्म 2 परीक्षेचा एकत्रित निकाल अधिकृत वेबसाइटवर अपलोड केला जाईल.

जाहिरात

परत परीक्षा रद्द करण्याची मागणी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल: कोरोनामुळे मागील वर्षी CBSE बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams) रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (CBSE 10th 12th Exams 2022) दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी टर्म 1 (CBSE Term 1 Exam) ची परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक CBSE टर्म 1 चा निकाल (CBSE Term 1 Exam Result) वेबसाइटवर अपलोड होण्याची वाट पाहत होते पण CBSE बोर्डाने तो शाळांना पाठवून सर्वांना आश्चर्यचकित केले. CBSE टर्म 1 आणि टर्म 2 परीक्षेचा एकत्रित निकाल अधिकृत वेबसाइटवर अपलोड केला जाईल. CBSE Term II Exam: विद्यार्थ्यांनो, बोर्डानं परीक्षेसाठी नियमावली केली जारी; पेपरला जाण्याआधी हे वाचा CBSE बोर्ड परीक्षा 2022 शी संबंधित अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. कधी प्रवेशपत्र जाहीर झाल्याची बातमी येते तर कधी आणखी काही. CBSE टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे. यंदा सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा २५ मेपर्यंत तर १२वीची परीक्षा १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. CBSE बोर्डाचे निकाल जुलै 2022 मध्ये जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. टॉपर्सची प्रत अपलोड केली जाईल? CBSE बोर्ड परीक्षेच्या (CBSE Board Exam 2022) टर्म 1 मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तर प्रती CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर अपलोड केल्या जाऊ शकतात. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे. मात्र अद्याप सीबीएसई बोर्डाने या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही. CBSE Vs ICSE: सीबीएसई की आयसीएसई? तुमच्या मुलांसाठी कोणतं बोर्ड आहे उत्तम? इथे मिळेल उत्तर विद्यार्थ्यांना तयारीसाठी मिळेल मदत सीबीएसई बोर्डाने खरे तर टॉपर्सची कॉपी ऑनलाइन वेबसाइटवर अपलोड केली किंवा विद्यार्थ्यांच्या संदर्भासाठी शाळांना पाठवली, तर विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो. CBSE बोर्डाच्या पुढील बॅचचे विद्यार्थी देखील या उत्तर प्रती मॉडेल पेपर (CBSE Model paper) म्हणून वापरू शकतात. कदाचित येत्या काही दिवसांत बोर्ड त्यावर आपला शिक्का मारेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या