JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: 12वीनंतर लगेच सुरु करा 'हे' कोर्सेस; वर्षभरात मिळेल मोठ्या पॅकेजची नोकरी

Career Tips: 12वीनंतर लगेच सुरु करा 'हे' कोर्सेस; वर्षभरात मिळेल मोठ्या पॅकेजची नोकरी

हे शॉर्ट टर्म कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला नोकरी मिळू शकेल. चला तर जाणून घेऊया या कोर्सेसबद्दल.

जाहिरात

करा 'हे' कोर्सेस आणि घ्या बंपर सॅलरी जॉब्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 सप्टेंबर: आजकाल अनेक विद्यार्थ्यांना लेगच पैसे कमवण्याची इच्छा असते. यासाठी त्यांना अधिक वेळ वाटही बघ्याची नसते. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर त्यांना लगेच जॉब हवा असतो. घरची आर्थिक परिस्थिती यामागची एक प्रमुख कारण असू शकतं. बारावीनंतर हे शक्य आहे. आता तुम्ही बारावी उत्तीर्ण केल्यांनतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस करून नोकरी करू शकता. अर्थात नोकरीत समोर जाण्यासाठी तुम्हाला पदवीपर्यंत शिक्षण महत्त्वाचं असेल मात्र हे शॉर्ट टर्म कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला नोकरी मिळू शकेल. चला तर जाणून घेऊया या कोर्सेसबद्दल. डिप्लोमा इन वेब डिझायनिंग 12वी ते ग्रॅज्युएशन उत्तीर्ण झालेले लोक डिप्लोमा इन वेब डिझायनिंग कोर्स (Web Designing Courses) करू शकतात. ते 3 महिने ते 9 महिन्यांत पूर्ण होऊ शकते. कोर्स पूर्ण केल्यानंतर वेब डिझायनर (How to become Web Designer), डिझायनिंग एक्झिक्युटिव्ह इत्यादी पदांवर नोकरी मिळू शकते. लाल रंग म्हणजे धोक्याची घंटा; मग Job Interview साठी ‘या’ रंगाचे कपडे उत्तम

डिजिटल मार्केटिंग कोर्स

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमांची (Digital Marketing courses) मागणी खूप वाढली आहे. 12वी पास ते ग्रॅज्युएट पर्यंत कोणीही हे करू शकतो. त्याचा कालावधी 3 महिन्यांपासून 12 महिन्यांपर्यंत बदलतो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्ही एक्झिक्युटिव्ह, डिजिटल मार्केटिंग मॅनेजर (How to become digital marketing Manager), डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट आणि डिजिटल मार्केटर या पदांसाठी अर्ज करू शकता. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management Courses) कोर्स हा सदाबहार मानला जातो. यासाठी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अर्ज करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिने ते 1 वर्षापर्यंत असतो. हा कोर्स केल्यानंतर शेफ (How to become Chef), रिसेप्शनिस्ट, रूम सर्विस स्टाफ, मॅनेजर इत्यादी पदांसाठी अर्ज करता येतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या