JOIN US
मराठी बातम्या / करिअर / करिअरमध्ये प्रगतीत अडथळा आणणाऱ्या बाबी कोणत्या? जाणून घ्या...

करिअरमध्ये प्रगतीत अडथळा आणणाऱ्या बाबी कोणत्या? जाणून घ्या...

काही जणांना करिअरमध्ये मोठं तर व्हायचं असतं; पण नेमकं काय व्हायचं आहे, नेमकं कोणतं काम करायचं आहे, याचं उद्दिष्ट त्यांनी ठरवलेलं नसतं.

जाहिरात

Career success

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जुलै : करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपडत असते. साहजिकच जास्तीत जास्त पैसे कमावणं हे उद्दिष्ट असतंच; पण यशस्वी होण्याची वेगवेगळी स्वप्नं प्रत्येकाने पाहिलेली असतात. कोणी बॉस होऊन टीम लीड करण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं, तर कोणी उत्तम कामगिरी करून मोठं नाव कमवायचं किंवा पुरस्कार मिळवण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. त्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो; पण काही कारणांमुळे काही व्यक्तींची प्रगती खुंटते. करिअरमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळवता येत नाही. ती कारणं कोणती असू शकतात, याची माहिती घेऊ या. ‘अमर उजाला’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

काही जणांना करिअरमध्ये मोठं तर व्हायचं असतं; पण नेमकं काय व्हायचं आहे, नेमकं कोणतं काम करायचं आहे, याचं उद्दिष्ट त्यांनी ठरवलेलं नसतं. मोघमात ठरवलेलं असणं किंवा एखादी गोष्ट स्पष्ट ठरवलेली नसणं यांमुळे त्यांना पुढे जाण्याचा मार्ग निवडताना अडचण येते. त्यामुळे प्रत्येकाने आपली उद्दिष्टं नेमकेपणाने ठरवावीत. म्हणजे त्या दिशेने वाटचाल करणं सोपं ठरतं. यशस्वी न होण्याचं आणखी एक कारण म्हणजे स्वतःला अपडेट न ठेवणं. सध्याच्या जगात दररोज काही ना काही नवं येत आहे. प्रगती होते. तंत्रज्ञान सुधारत आहे. त्यामुळे जीवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे एकदा घेतलेलं शिक्षण आणि प्राप्त केलेली कौशल्यं यांच्यावरच समाधानी राहणं पुरेसं ठरत नाही. आपलं ज्ञान, कौशल्यं या बाबींमध्ये सतत भर घालत राहणं, स्वतःला अपडेट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच यशाचा मार्ग सुकर होतो. कनेक्शन्स आणि नेटवर्किंग मजबूत असणं हेदेखील करिअरमध्ये यशस्वितेसाठी अत्यावश्यक आहे. आपल्याकडे कोणती कौशल्यं आहेत, आपण कोणतं काम उत्तमरीत्या करू शकतो, आपल्याकडे कोणतं खास ज्ञान आहे, या बाबी शेअर करण्यासाठी नेटवर्किंग आणि कनेक्शन्स महत्त्वाची आहेत. त्यातूनच आपल्याला साजेशा पुढच्या पुढच्या संधी मिळत जातात आणि प्रगती होत जाते. प्रगती खुंटण्याचं आणखी एक कारण म्हणजे तोट्यात असलेल्या एकाच कंपनीत वर्षानुवर्षं काम करत राहणं. असं असेल, तर साहजिकच कंपनीची वाढ खुंटलेली असते. त्यामुळे तिथे काम करणाऱ्यांच्या प्रगतीलाही मर्यादा येतात. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे वर्क एन्व्हायर्न्मेंट. आपण जिथे काम करतो, तिथलं वातावरण चांगलं नसलं, नकारात्मक असलं, तर तिथे चांगल्या प्रकारे काम करता येत नाही. त्यामुळे साहजिकच मानसिकतेवरही परिणाम होतो. त्याचा परिणाम वैयक्तिक प्रगतीवर होतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या करिअरमध्ये वाटचाल करावी आणि प्रगती साध्य करावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या