JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: इंटर्नशिप करताना तिथे जॉब हवाय? मग ऑफिसमध्ये 'या' पद्धतीनं करा काम; वाचा टिप्स

Career Tips: इंटर्नशिप करताना तिथे जॉब हवाय? मग ऑफिसमध्ये 'या' पद्धतीनं करा काम; वाचा टिप्स

इंटर्नशिप करताना उमेदवारांना त्याच कंपनीत जॉबवर घेण्याची आशा दाखवली जाते. कित्येकदा उमेदवारांच्या परफॉर्मन्सनुसार त्यांना जॉबही दिला जातो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मार्च: आजकालच्या काळात कोणत्याही कंपनीत चांगली नोकरी (How to get a job) हवी आले तर त्या आधी Internship करणं (Internship Tips) आवश्यक असतं. काही कॉलेजमध्ये तर फायनल इयरलाच इंटर्नशिप (Internship in final year) करणं अनिवार्य असतं. इंटर्नशिप केल्यामुळे (Advantages of Internship) उमेदवारांना कामाचा अनुभव तर येतोच पण कंपनीतील प्रत्यक्ष वातावरण कशा प्रकारचं असतं याबद्दल एक आयडिया येते. म्हणून इंटर्नशिप महत्त्वाची असते. काही मोठ्या आणि नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करताना उमेदवारांना त्याच कंपनीत जॉबवर (How to get job while doing Internship) घेण्याची आशा दाखवली जाते. कित्येकदा उमेदवारांच्या परफॉर्मन्सनुसार त्यांना जॉबही दिला जातो. तुम्हालाही इंटर्नशिप झाल्यानंतर त्याच कंपनीत जॉब करण्याची इच्छा आहे? (How to get job after Internship) मग हे बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सहा काही टिप्स (Tips to get job after Internship) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही इंटर्नशिप करताना त्याच कंपनीत जॉब मिळवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया. वेळेत ऑफिसला जा इंटर्नशिप दरम्यान, तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही दररोज वेळेवर ऑफिसला पोहोचता. सर्व डेडलाइन पूर्ण करा, ऑफिस सोडण्याची घाई करू नका, शिस्त तुमची सचोटी दर्शवतेतुम्ही कंपनीचे कर्मचारी आहात अशा प्रमाणे वागा. ज्यामुळे तुम्हाला तुमचं इम्प्रेशन चांगलं तयार करता येईल. उमेदवारांनो, आता Campus Placement मध्ये तुमची नोकरी पक्की; फक्त मुलाखतीनंतर करा ही कामं

 कामासाठी तत्पर राहा

तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे ते तुमच्या वरिष्ठांना सांगा, विचारले नसले तरी नवीन कल्पना द्या. जिथे तुम्हाला समस्या दिसतील तिथे मदत ऑफर करा. इंटर्नला त्याच्या आत्मविश्वास आणि पुढे काम करण्याच्या उत्सुकतेचा दाखला म्हणून घेतले जाते. म्हणूनच मिळेल ते काम करा. कधीही नाही म्हणू नका. कामासाठी सतत तयार राहा. कामात आवड दाखवा इंटर्नशिप दरम्यान तुम्हाला मिळालेल्या कार्याला तुमचे सर्वोत्तम द्या, मग ते कंटाळवाणे असो किंवा आव्हानात्मक. कोणतेही काम छोटं मानू नका आणि त्या गोष्टी करायला नकार देऊ नका. असे केल्याने हे शक्य आहे की कंपनी तुम्हाला गर्विष्ठ समजेल आणि पुन्हा कॉल करणार नाही. म्हणूनच कोणतंही काम आवडीने करा. विद्यार्थ्यांनो, परदेशात शिक्षण घेण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या Entrance Exams देणं आवश्यक; जाणून घ्या संपूर्ण माहिती प्रोफेशनल कनेक्शन वाढवा इंटर्नशिप ही कनेक्शन बनवण्याची उत्तम संधी आहे. इंटर्नशिपमध्ये, तुम्ही केवळ नोकरीच शिकत नाही तर तुमची ओळख वाढवण्याची उत्तम संधीही तुमच्याकडे आहे. तुमच्या प्रकल्पाशी संबंधित लोकांव्यतिरिक्त प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ओळख तयार करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे प्रोफेशनल कॉन्टॅक्टस वाढतील आणि तुम्हाला नोकरी मिळण्यात मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या