JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालंय? मग या क्षेत्रांमध्ये करू शकता करिअर

Career Tips: अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालंय? मग या क्षेत्रांमध्ये करू शकता करिअर

आज आम्ही तुम्हाला Economics या क्षेत्रातील काही महत्वाच्या सेक्टर्सबद्दल (Career After Economics) सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 एप्रिल: सध्या काळात Economics या क्षेत्रात करिअरच्या (Career in Economics) अनेक साधी उपलब्ध आहेत. पैशांचे व्यवहार, नियोजन आणि इतर गोष्टींसाठी Economics म्हणून अर्थशास्त्राची (How to make career in Economics) मदत घेणं आवश्यक आहे. त्यामुळे क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीही अधिक आहेत. अनेक विद्यार्थ्यांकडे पदवी तर आहे मात्र त्याचा उपयोग जॉब मिळवण्यासाठी (Jobs after Economics degree) त्यांना करता येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला Economics या क्षेत्रातील काही महत्वाच्या सेक्टर्सबद्दल (Career After Economics) सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया. अर्थशास्त्री अर्थशास्त्र पदवीधर अर्थशास्त्र संशोधनात करिअर निवडू शकतात, ज्यामध्ये त्यांना डेटा गोळा करणे, बाजारातील ट्रेंडचा अंदाज लावणे, आर्थिक आणि सांख्यिकीय डेटाचा अभ्यास करणे यासारखी विविध कामे करावी लागतात. उमेदवार सल्लागार संस्थांमध्ये देखील सामील होऊ शकतात किंवा स्वतंत्रपणे काम करू शकतात. सामान्यतः, आर्थिक सल्लागार विशिष्ट क्षेत्रांमध्ये तज्ञ म्हणून काम करतात JOB ALERT: मुंबईतील ‘या’ राष्ट्रीय संस्थेत ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जॉबची संधी शिक्षक तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात रस असेल, तर शिक्षकी पेशा हा तुमच्यासाठी सर्वोत्तम करिअर स्कोप असू शकतो. अर्थशास्त्र पदवीधर म्हणून, तुम्ही CTET किंवा इतर राज्यस्तरीय अध्यापन परीक्षांना बसू शकता आणि शिक्षक होऊ शकता. तुमच्याकडे एमएची पदवी असल्यास, तुम्ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेला बसू शकता. भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक किंवा कोणत्याही संशोधन संस्थेत कनिष्ठ संशोधन फेलोशिप मिळू शकते. जर तुम्ही 50% गुणांसह MA उत्तीर्ण केले असेल. भारतीय आर्थिक सेवा हे अर्थशास्त्रातील सर्वोत्तम करिअर स्कोपपैकी एक आहे. IES होण्यासाठी तुम्हाला इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस परीक्षेत बसावे लागेल, यासाठी तुम्हाला किमान 55% गुणांसह एमएससी किंवा एमए उत्तीर्ण करावे लागेल. निवडीनंतर, देशासाठी नियोजन आयोगांमध्ये आर्थिक नियोजन आणि विश्लेषणासारखी कार्ये करण्याची संधी आहे. नियोजन मंडळ, आर्थिक व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण आणि इतर विभागांमध्ये देखील ठेवले जाऊ शकते. आयईएस परीक्षा यूपीएससीद्वारे घेतली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या