मुंबई, 09 एप्रिल: राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई (National Institute of Industrial Engineering) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NITIE Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार (Apprentice) - एकूण जागा 10 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिकाऊ उमेदवार (Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com/ BA/ B.Sc IT / CS ग्रॅज्युएट डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी वरील क्षेत्रांमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. परीक्षा न देताही IBPS मध्ये मिळेल 61,818 रुपये पगाराची नोकरी; थेट होणार मुलाखत
इतका मिळणार Stipend
शिकाऊ उमेदवार (Apprentice) - 12, 000/-.रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता रजिस्ट्रार, NITIE, विहार लेक रोड, पवई, मुंबई- 400087. आवेदन पाठवण्याचा ईमेल आयडी nitierecruit@nitie.ac.in 10वी पास उमेदवारांनो, ‘या’ जिल्ह्यातील न्यायालयात 57,000 रुपये पगाराची नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 एप्रिल 2022
JOB TITLE | NITIE Mumbai Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | शिकाऊ उमेदवार (Apprentice) - एकूण जागा 10 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शिकाऊ उमेदवार (Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com/ BA/ B.Sc IT / CS ग्रॅज्युएट डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी वरील क्षेत्रांमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार Stipend | शिकाऊ उमेदवार (Apprentice) - 12, 000/-.रुपये प्रतिमहिना |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | रजिस्ट्रार, NITIE, विहार लेक रोड, पवई, मुंबई- 400087. / nitierecruit@nitie.ac.in |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nitie.edu/ या लिंकवर क्लिक करा.