कोणत्याही क्षेत्रातील ग्रॅज्युएशन कोर्स
मुंबई, 28 मार्च: बारावीची परीक्षा (career options after 12th) नुकतीच संपली आहे. त्यामुळे आता सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. गेल्या दोन वर्षात ऑफलाईन न झालेली बारावीची परीक्षा ऑफलाईन (Offline Exams) झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्थातच निकालाचं प्रचंड टेन्शन आहे. निकाल ( 12th Result date ) चांगला लागेल का? चांगले मार्क्स मिळतील का? चांगल्या कॉलेजमध्ये (How to get admission in good college after 12th) प्रवेश मिळेल का? असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येऊ लागले आहेत. मात्र कोणत्याही क्षेत्रातील ग्रॅज्युएशन कोर्स ( Graduation course after 12th ) करण्याआधी विद्यार्थ्यांना त्यासाठी स्वतःला तयार करणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी (Factor to be consider before take admission in graduation) सांगणार आहोत ज्या कोणत्याही ग्रॅज्युएशन कोर्स करण्याआधी विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. महिलांनो, नर्सिंग क्षेत्रात तुच्यासाठी आहेत करिअरच्या अनेक संधी; नर्स होण्यासाठी इथे मिळेल संपूर्ण माहिती आवडीचा कोर्स निवडणं आवश्यक कोणत्याही UG कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी, विद्यार्थ्यांनी प्रथम त्यांची ताकद, कमकुवतता आणि इच्छा ओळखणे आवश्यक आहे. हे त्यांना त्यांच्या आवडीचा अभ्यासक्रम शॉर्टलिस्ट करण्यात मदत करेल. विद्यार्थ्यांना विषय निवडताना अनेक बाबी लक्षात ठेवाव्या लागतात. यामध्ये त्यांची त्या विषयाची आवड, त्या विषयाची व्याप्ती आणि त्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्या अभ्यासक्रमाची पायाभूत सुविधा विकसित केली आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ड्रीम कॉलेजेस निवडणे विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचा विषय निवडल्यानंतर, दुसरी गोष्ट म्हणजे महाविद्यालये किंवा विद्यापीठांची शॉर्टलिस्ट करणे. विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण घ्यायचे आहे ते कॉलेजेस निवडणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कोणतेही आंतरराष्ट्रीय महाविद्यालय किंवा विद्यापीठ निवडण्याचा पर्याय आहे. संस्थेच्या निवडीदरम्यान, विद्यार्थ्यांना किमान 4 संभाव्य महाविद्यालये निवडण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून ते कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतील. म्हणूनच विद्यार्थ्यांना त्यांचे ड्रीम कॉलेजेस निवडणं आवश्यक आहे. सुटीच्या काळात सर्व कॉलेजेसची माहिती मिळवणं विद्यार्थ्यांसाठी अशक्य नाही. GRE म्हणजे नक्की काय? परदेशात शिक्षणासाठी कशी द्याल GRE? वाचा संपूर्ण माहिती
प्रवेश परीक्षांची तयारी आवश्यक
भारतातील बहुतेक महाविद्यालये १२वीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना यूजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देतात. म्हणूनच, महाविद्यालयांनी जारी केलेले कट-ऑफ लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमात आणि महाविद्यालयात प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या 12वी वर्गासाठी चांगली तयारी केली पाहिजे. अशी काही विद्यापीठे आहेत जी यूजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी संशोधन करून या प्रवेश परीक्षांची संपूर्ण माहिती गोळा करणे आवश्यक आहे. सुटीच्या काळात प्रवेश परीक्षांची तयारी करणे आवश्यक आहे.