JOIN US
मराठी बातम्या / करिअर / विद्यार्थ्यांनो, परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग कोणत्या देशात कुठले कोर्सेस आहेत उत्तम; जाणून घ्या

विद्यार्थ्यांनो, परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग कोणत्या देशात कुठले कोर्सेस आहेत उत्तम; जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला उच्च शिक्षणासाठी काही देश आणि त्या देशांमधील काही कोर्सेस (Best courses in different countries) याबद्दल माहिती देणार आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मार्च: परदेशात शिक्षणासाठी जाण्याचं (Education in Abroad) अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी प्रचंड मेहनत करून आणि चांगले गुण मिळवून विध्यर्थ स्वतःला तयारही करतात. पण परदेशात शिक्षण (Study in Abroad) म्हंटलं की मोठ्या प्रमाणावर पैशांची उभारणी करावी लागते. जाण्यापासून राहण्यापर्यंतचा खर्च लाखो रुपये (Money for going abroad) असतो. त्यात काही देश हे विद्यार्थ्यांचे लाडके आहेत. कॅनडा, आयर्लंड, अमेरिका, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये विद्यार्थी (Best country for higher studies for Indian Students) जातात. मात्र जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हालाही उच्च शिक्षणासाठी (Higher studies in foreign) जायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला उच्च शिक्षणासाठी काही देश आणि त्या देशांमधील काही कोर्सेस (Best courses in different countries) याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. GRE म्हणजे नक्की काय? परदेशात शिक्षणासाठी कशी द्याल GRE? वाचा संपूर्ण माहिती

USA म्हणजेच अमेरिका

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका किंवा यूएसए हे सर्वसाधारणपणे परदेशातील अभ्यासाला जाण्याच्या यादीत अव्वल आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांसाठी USA हे आवडते ठिकाण आहे. आयव्ही लीग महाविद्यालये आणि हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, प्रिन्स्टन आणि एमआयटी सारखी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय प्रतिभा असणारी असल्यामुळे विद्यार्थी या देशाला पहिली पसंती देतात. यूएस हे निश्चितपणे परदेशातील अभ्यासासाठी सर्वात पसंतीचे ठिकाण आहे. अमेरिकेत व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यास, अभियांत्रिकी, गणित आणि संगणक विज्ञान, सामाजिकशास्त्रे, भौतिक आणि जीवन विज्ञान हे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी उत्तम कोर्सेस आहेत. कॅनडा भारतीयांसाठी परदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात आवडते अभ्यासाचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. शिक्षणाची गुणवत्ता, परवडणारी किंमत आणि सुरक्षित आणि बहुसांस्कृतिक वातावरण हे महत्त्वाचे घटक आहेत जे भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण केंद्र म्हणून कॅनडाच्या लोकप्रियतेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. म्हणूनच भारतीय विद्यार्थ्यांसाठी कॅनडामध्ये व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यास, अभियांत्रिकी, गणित आणि संगणक विज्ञान, लाईफ सायन्स असे कोर्सेस उपयुक्त ठरतात. Career Tips: तुम्हालाही प्रायव्हेट जॉब हवाय? मग अशा पद्धतीनं करा Job Search

 जर्मनी

दर्जेदार आणि परवडणार्‍या शिक्षणामुळे जर्मनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक पसंतीच्या देशांच्या यादीत सातत्याने वरच्या स्थानावर पोहोचले आहे. बहुसंख्य जर्मन विद्यापीठे नाममात्र फी घेतात किंवा कोणतेही शिक्षण शुल्क आकारत नाहीत. म्हणूनच जास्तीत जास्त विद्यार्थी या देशात शिक्षणाच्या मागे असतात. तसंच त्यांच्याद्वारे प्रदान केलेल्या पदव्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत. म्हणूनच भारतीयांसाठी परदेशातील सर्वोत्तम देशांपैकी जर्मनी उत्तम आहे. जर्मनीत अभियांत्रिकी, व्यवसाय / व्यवस्थापन अभ्यास, कला/मानवता, गणित आणि संगणक विज्ञान आणि आर्टस् हे विद्यार्थ्यांचे आवडते कोर्सेस आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या