JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: ग्रॅज्युएशननंतर तुम्हालाही भरघोस पगाराची नोकरी हवीये; 'हे' PG डिप्लोमा कोर्सेस कराच

Career Tips: ग्रॅज्युएशननंतर तुम्हालाही भरघोस पगाराची नोकरी हवीये; 'हे' PG डिप्लोमा कोर्सेस कराच

आज आम्ही तुम्हाला असे काही पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्सेस सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला भरघोस पगाराचा जॉब (How to get high salary jobs) मिळू शकेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 मार्च: आजकालच्या काळत ग्रॅज्युएशनंतर पोस्ट ग्रॅज्युएशन (Post Graduation) करणाऱ्या विद्यार्थ्यंची संख्या कमी झाली आहे. मात्र ग्रॅज्युएशन नंतर जॉब (Jobs after Graduation) मिळेलच असं नाही. पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी अनेकजण दोन किंवा तीन वर्षांची वाट बघू शकत नाहीत, ग्रॅज्युएशन नंतर लोकांना लगेच जॉब (How to get jobs after Graduation) हवा असतो. म्हणून डिप्लोमा कोर्सेस (best Post Graduation Diploma Courses) कामी येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्सेस सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला भरघोस पगाराचा जॉब (How to get high salary jobs) मिळू शकेल. चला तर मग जाणून घेऊया. PGDM पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट म्हणजेच PGDM हा बी-स्कूल्सद्वारे ऑफर केलेला 2 वर्षांचा मॅनेजमेंट कोर्स आहे. कोर्ससाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी 50 ते 70 टक्के गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी. PGDM अभ्यासक्रमांना प्रवेश CAT, MAT, XAT इत्यादी व्यवस्थापन प्रवेश परीक्षांच्या आधारे दिला जातो. यानंतर वैयक्तिक मुलाखत आणि गट चर्चा. कोर्स करणाऱ्या उमेदवारांना बँका, संशोधन संस्था, वित्तीय संस्था, शैक्षणिक क्षेत्र, उत्पादन क्षेत्र इत्यादींमध्ये नोकऱ्या मिळू शकतात. सुवर्णसंधी! Indian Navy तर्फे ‘या’ पदांच्या 2500 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा PGD इन कम्प्युटर पीजीडी इन कॉम्प्युटर सायन्स हा कॉम्प्युटर सायन्समधील डिप्लोमा कोर्स आहे जो दोन सेमिस्टर आणि एका वर्षात पूर्ण केला जातो. या कोर्समध्ये सीए, एचटीएमएल, जावा, डेटाबेस मॅनेजमेंट आणि ओरॅकल इत्यादी विषयांचे ज्ञान दिले जाते. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया एका संस्थेनुसार बदलते, काही प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतात, तर काही पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवार वेब डिझायनर, सिस्टम अॅनालिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर होऊ शकतात. Mobile App Development आजच्या युगात मोबाईल अॅप डेव्हलपर्सचे महत्त्व सांगण्याची गरज नाही. मोबाईल फोन वापरणारा प्रत्येकजण त्यावर विविध ऍप्लिकेशन्स वापरतो. कोणताही उमेदवार पदवीनंतर मोबाईल अॅप डेव्हलपमेंटमध्ये डिप्लोमा कोर्स करू शकतो, जो विविध प्रकारचा आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवार टॉप मोबाइल अॅप डेव्हलपर बनू शकतात. महिलांनो, ‘या’ क्षेत्रांमध्ये करिअर करून व्हा यशस्वी; मिळू शकतो लाखो रुपये पगार

 फॅशन डिझायनिंग

हा दोन वर्षांचा नियमित पीजी कोर्स किंवा 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स असू शकतो. फॅशन आणि टेक्सटाईल डिझायनिंगमध्ये डिप्लोमा कोर्स केल्यानंतर टेक्सटाईल, अ‍ॅपेरल, फूटवेअर, अॅक्सेसरीज आणि फॅशन आणि इतर क्षेत्रात कमाईच्या अनेक संधी आहेत. मार्केटिंग, रिटेलिंग, मर्चेंडाइजिंग, ब्रँड मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, एक्सपोर्ट मॅनेजमेंट आणि मार्केट रिसर्च इत्यादी विषयांमध्ये स्पेशलायझेशन मिळवता येते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि पर्ल अॅकॅडमी ऑफ फॅशन इत्यादीसारख्या काही आघाडीच्या संस्था हे अभ्यासक्रम देतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या