प्रेम प्रकरणातून तरुणीची फसवणूक
नील कमल, प्रतिनिधी पलामू, 26 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना घडत आहेत. यासोबतच लिव्ह-इन नात्यात तयार झालेल्या तणावातूनही आत्महत्या आणि खूनाच्या घटना घडत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या 4 दिवस आधी पळालेल्या तरुणीसोबत तिच्या प्रियकराने शारिरीक संबंध ठेवले आणि मग यानंतर त्याने या तरुणीसोबत लग्नाला नकार दिला. एकीकडे पळून गेल्याने लग्नही मोडले गेले आणि दुसरीकडे ज्याच्यासोबत पळून गेली, त्या प्रियकरानेही शारिरीक संबंध ठेवल्यानंतर फसवणूक केली. ही घटना झारखंडच्या पलामूमध्ये घडली. यामुळे व्यथित झालेल्या तरुणीने पलामू येथील पाकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिने गावातील पंकज गुप्ता याच्यावर लग्नाचे आमिष देत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. सध्या आरोपी तरुण पंकज गुप्ता हा फरार आहे.
पाकी पोलीस ठाणे हद्दीतील परसिया गावात ही घटना घडली. येथे पंकज नावाच्या तरुणाचे एका मुलीसोबत वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. दोघेही फोनवर खूप वेळ बोलायचे आणि संधी मिळेल तेव्हा भेटायचे. पंकजने मुलीला लग्नाचे आमिष दिले होते. त्याला तिने होकारही कळवला होता. नंतर जेव्हा तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला तर पाठ फिरवू लागला. यादरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले. 22 जून 2023 रोजी तिचे लग्न होणार होते. पण तिचे लग्न होत असल्याची माहिती पंकजला माहिती झाल्यावर त्या हे मान्य झाले नाही. त्याने पुन्हा, मी तुझ्याशी लग्न करणार असल्याचे त्या मुलीला सांगितले. पंकजच्या या शब्दावर ही मुलगी पुन्हा भाळली आणि त्याच्यासोबत पळून गेली. दोघेही दिल्लीला पळून गेले. मुलगी पळून गेल्याने तिचे ठरलेले लग्न मोडले गेले. पण दुसरीकडे दिल्लीत पंकजने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि 22 जूननंतर पंकजचा विचार बदलला. त्याने तिच्यासोबत लग्नाला नकार दिला. एकीकडे पळून गेल्याने लग्नही मोडले गेले आणि दुसरीकडे ज्याच्यासोबत पळून गेली, त्या प्रियकरानेही शारिरीक संबंध ठेवल्यानंतर फसवणूक केली. यामुळे व्यथित झालेल्या मुलीने पलामू येथे पोहोचून हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून त्यांनी पंकजविरोधात गुन्हा दाखल केला. तर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पंकजच्या कुटुंबीयांनी मुलीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर प्रकरण शांत करण्यासाठी दबाव टाकला. तर मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पंकज गुप्ता सध्या फरार आहे. मात्र लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.