ही घ्या IMP प्रश्नांची List
मुंबई, 12 फेब्रुवारी: महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या परीक्षा येत्या काही दिवसात सुरु होणार आहेत. तसंच विद्यार्थ्यांनी यासाठी प्रचंड अभ्यास सुरु केला आहे. सर्व विषयांचा अभ्यास पूर्ण झाला असला तरी काही विषय असे असतात ज्यांच्या अभ्यास कधीच पूर्ण होत नाही. ते विषय म्हणजे गणित आणि सायन्स. सायन्सचे दोन पेपर असणार आहेत. फिजिक्स आणि केमेस्ट्री. यापैकी फिजीक्सच्या पेपरचे काही महत्त्वाचे प्रश्न आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसंच या पेपरचं प्रश्नांचं पॅटर्न कसं असे हेही सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. यंदा संपूर्ण वर्ष शाळा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला आहे. यंदा सायन्सचा पहिला पेपर हा एकूण चाळीस मार्कांचा असणार आहे. तर ऑप्शनसह तुम्हाला 60 मार्कांचा पेपर असेल. तसंच पेपरचं टायमिंग 2 तासांचं असणार आहे. Board Exam Tips: बोर्डाच्या परीक्षेत भूमितीचं टेन्शन तुम्हीही घेतलंय? चिंता नको; ही घ्या IMP प्रश्नांची यादी Video Question Number 1 Question Number 2 मध्ये A आणि B हे दोन उपप्रश्न असणार आहेत. Question Number 1 A मध्ये तुम्हाला प्रत्येकी 1 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये एकूण प्रश्न 5 असणार आहेत. तर प्रत्येक प्रश्न हा मल्टिपल चॉईस प्रश्न असणार आहे. या प्रश्नातील सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक असणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची चॉईस देण्यात येणार नाहीये. यातील प्रश्न B मध्येही 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. Question Number 2 Question Number 2 मध्ये A आणि B हे दोन उपप्रश्न असणार आहेत. यामध्ये A प्रश्नमध्ये 2 मार्कांचे 3 प्रश्न विचारण्यात येणार आहेत यापैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे आहेत. तर B प्रश्नामध्ये 2 मार्काचे 5 प्रश्न विचारण्यात येणार आहेत यापैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. Board Exam Tips: बोर्डाच्या परीक्षेत भूमितीचं टेन्शन तुम्हीही घेतलंय? चिंता नको; ही घ्या IMP प्रश्नांची यादी Video Question Number 3 Question Number 3 मध्ये 3 मार्कांचे 8 प्रश्न असणार आहेत. यापैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. एकूण 15 मार्कांचे प्रश्न असणार आहेत. Question Number 4 Question Number 4 मध्ये 5 मार्कांचे 2 प्रश्न असणार आहे. यापैकी कोणताही एकच प्रश्न सोडवायचा आहे.
सायन्स -1 पेपरला नक्की पेपरचं पॅटर्न कसं असणार आहे आणि या पेपरमध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत याबाबत वरील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.