JOIN US
मराठी बातम्या / करिअर / BEL Recruitment 2022 : इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअर्ससाठी जाॅबची सुवर्णसंधी! संरक्षण मंत्रालयाच्या भारत इलेक्ट्राॅनिक्समध्ये 150 पदांची भरती, लवकर अर्ज करा

BEL Recruitment 2022 : इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअर्ससाठी जाॅबची सुवर्णसंधी! संरक्षण मंत्रालयाच्या भारत इलेक्ट्राॅनिक्समध्ये 150 पदांची भरती, लवकर अर्ज करा

संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या भारत इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेडमध्ये इलेक्ट्राॅनिक इंजिनिअर्ससाठी प्रोजेक्ट इंजिनिअर आणि ट्रेनी इंजिनिअर पदासाठी एकूण 150 जागा निघाल्या आहेत.

जाहिरात

Electronics Engineer job

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या भारत इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेडमध्ये 150 जागांची भरती (BEL Recruitment 2022) करण्यात येणार आहे. यामध्ये ट्रेनी इंजिनिअरसाठी 80 आणि प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी 70 जागा आहेत. प्रोजेक्ट इंजिनिअरच्या ईसीईमध्ये 44, मॅकेनिकलमध्ये 20. ईईईमध्ये 4 आणि सीएसमध्ये 2 पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ट्रेनी इंजिनिअरच्या ईसीईमध्ये 54, मॅकेनिकलमध्ये 20, ईईईमध्ये 4 आणि सीएस मध्ये 2 जागांची भरती निघाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2022 आहे. या भरती काॅन्ट्रॅक्टवर होणार आहेत. (Project Engineer and Trainee Engineer vacancies)

वयाची मर्यादा किती आहे?

ट्रेनी इंजिनिअर पदासाठी वयाची मर्यादा ही 28 वर्षे आहे. तर, प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी वयाची मर्यादा 32 वर्षांची आहे. एससी आणि एसटी वर्गासाठी वयामध्ये 5 वर्षांती सवलत आहे, तर ओबीसी पदासाठी 3 वर्षांची सवलत आहे. वयाची गणना 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे. वाचा :  Rutuja Bagwe: कातिल नजरांनीच केलं घायाळ; ही अभिनेत्री कोण आहे तुम्ही ओळखलंत का?

शैक्षणिक पात्रता किती आहे?

एआयसीटीई मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूटमधून 4 वर्षांचा बीएससी इंजिनिअरिंग किंवा बीटेक पूर्ण झालेलं असलं पाहिजे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन, कम्युनिकेशन, मैकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, काॅम्य्पुटर सायन्स, काॅम्य्पुटर सायन्स इंजिनिअरिंग, या विषयांची समावेश आहे. कमीत कमी 55 टक्के असणे गरजेचे आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग अर्जधारकांसाठी पास गरजेचा आहे.

सॅलरी किती मिळणार?

ट्रेनी इंजिनिअरसाठी 6 महिन्यांचा आणि प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी 2 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. ट्रेनी इंजिनिअरसाठी पहिल्या वर्षात 30000, दुसऱ्या वर्षात 35000 आणि तिसऱ्या वर्षासाठी 40000  अशी सॅलरी मिळणारी आहे. प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी पहिल्या वर्षात 40000, दुसऱ्या वर्षात 45000, तिसऱ्या वर्षात 50000 आणि चौथ्या वर्षात 55000 सॅलरी मिळणार आहे. वाचा :  RupeeVsDollar: रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत 80 रुपयांचा टप्पा पार; तुमच्यावर काय परिणाम होईल?

परीक्षा कशी होणार आणि फी किती असणार?

सर्वांत पहिल्यांदा अर्जदारांना लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येणार आहे. ही परीक्षा 85 गुणांची असणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी बोलविलं जाईल. मुलाखतीसाठी 15 मार्क्स ठेवलेले आहेत. लेखी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये जनरल किंवा ईडब्ल्यूएस आणि ओबीसीसाठी 35 टक्के गुण मिळणे गरजेचं आहे, तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडीसाठी 30 टक्के गुण मिळणं गरजेचं आहे. जनरल किंवा ईडब्ल्यूएस आणि ओबीसीमधील अर्जदारांकरीता प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी 472 रुपये फी आहे, तर ट्रेनी इंजिनिअर पदासाठी 177 रुपये फी आहे. एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी कोणतीही फी नाही. सविस्तर माहितीसाठी  https://www.bel-india.in/Documentviews.aspx?fileName=Web%20Ad%20EM-English-19-07-22.pdf या क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या