बीड, 2 मार्च : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला. यात ऊसतोड मजुराच्या मुलाने उसाच्या फडात काम करत एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील ऊसतोड मजुराचा मुलगा संतोष अजिनाथ खाडे यांनी एनटीडी प्रवर्गातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्यांचा हा प्रवास निश्चितच तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. तर याबरोबरच चिखली गावांतील स्वतः ऊसतोड मजुरी केलेल्या नागेश राम लाड यांनीदेखील घवघवीत यश मिळवले आहे. गावातील लोकांनी त्याची भव्य मिरवणूक काढत सत्कार केला. आई वडिलांच्या कष्टाचं चीज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याशिवाय मी शुन्य आहे. आई आणि बापुचे आयुष्य माझ्यासाठी कष्ट करण्यात गेले आहे. तेव्हा मी कुठे इथपर्यंत पोहोचलो आहे. एका ऊसतोड कामगाराच्या मागे भक्कमपणे उभे राहिलेले माझे सावरगाव घाट या गावाला मी कधीच विसरू शकत नसल्याचे संतोष खाडे यांनी म्हटले आहे. राज्यात पहिला, मात्र DSP च्या स्वप्नासाठी पुन्हा दिली परीक्षा; अखेर सांगलीच्या प्रमोदने मिळवलंच!
MPSC Results : एमपीएससीचा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले पहिला
एमपीएससी राज्यसेवा 2021 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रमोद चौगुले हा 633 मार्कांसह राज्यात पहिला आला आहे, तर शुभम पाटीलला 616 मार्क मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. मुलींमध्ये सोनाली मेत्रे पहिली आहे, तर ओव्हरऑल सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह 20 पदांच्या 405 जागांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या निकालाची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे..