JOIN US
मराठी बातम्या / करिअर / 10 वीत 44 टक्के, 13 वेळा नापास, पण हार मानली नाही; शेवटी झाला IAS अधिकारी!

10 वीत 44 टक्के, 13 वेळा नापास, पण हार मानली नाही; शेवटी झाला IAS अधिकारी!

दहावीचा निकाल नुकताच जाहीर झालाय. त्यामुळे सर्वत्र निकालाची धूम पहायला मिळत आहे. अनेकांना दहावीच्या परिक्षेत चांगले नंबर मिळाले तर काहींना कमी नंबर मिळाले आहेत.

जाहिरात

सक्सेस स्टोरी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 जून : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झालाय. त्यामुळे सर्वत्र निकालाची धूम पहायला मिळत आहे. अनेकांना दहावीच्या परिक्षेत चांगले नंबर मिळाले तर काहींना कमी नंबर मिळाले आहेत. असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांना परिक्षेत अपयश आलं आहे. मात्र यानं खचून जाऊ नका, धीर सोडू नका. असे अनेक लोक आहेत ज्यांनी दहावीत कमी नंबर मिळाले तरीही आज ते चांगल्या पोस्टवर कामाला आहे. अशाच एका IPS अधिकाऱ्याची यशोगाधा तुम्हाला सांगणार आहोत ज्यांना दहावीत कमी नंबर मिळाले. तरीही त्यांनी हार न मानता जिद्दीने यश संपादन केलं. या IPS अधिकाऱ्याचं नाव अवनीश शरण आहे. अवनीश हे एकदा नव्हे तर 13 वेळा नापास झाले. यानंतरही त्यांनी हिंमत हारली नाही. दहावीच्या परीक्षेतही त्यांना केवळ 44 टक्के गुण मिळाले होते. पण आपल्या मेहनत आणि जिद्दीने त्यांनी शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याचे जे स्वप्न असते ते साध्य केलं. दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी पास करून आयएएस अधिकारी होण्यात यश मिळवलं. आयएएस अवनीश शरणने ट्विट करत त्यांच्या निकालाविषयी सांगितलं.

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे की, ते किती वेळा आणि कोणत्या परीक्षेत नापास झाले. त्यांनी हे ट्विट करताच व्हायरल झालं आहे. लोकांना आयएएस अधिकाऱ्याचे ट्विट खूप प्रेरणादायी वाटत आहे. IAS अवनीश शरणने सांगितले की, ते 13 वेळा नापास झाले होते. यानंतर ते यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले.

संबंधित बातम्या

अवनीश यांना 10वीच्या परीक्षेत 44.7 टक्के गुण मिळाले होते. यानंतर त्यांना 12वीमध्ये 65 टक्के आणि 12 वीमध्ये 60 टक्के गुण मिळासे. यानंतर ते सीडीएस आणि सीपीएफमध्ये नापास झाले. त्याचवेळी राज्य लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परीक्षेत ते 10 पेक्षा जास्त वेळा नापास झाले होते. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली. दरम्यान, त्यामुळे दहावीच्या परिक्षेत तुम्हालाही कमी मार्क मिळाले असतील किंवा तुम्ही अपयशी झाला असाल तर खचून जावू नका. जिद्दीने आणि मेहनतीने पुन्हा प्रयत्न करा. शेवटी तुम्हाला यश हे मिळेलच.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या