लसीकरणादरम्यान धक्कादायक प्रकार
मुंबई, 28 जुलै: सध्या देशात शालेय विद्यार्थ्यांचं लसीकरण चांगलंच जोमात सुरु आहे. ज्या कोरोनामुळे अनेकांना आपले जीव गमावण्याची वेळ आली त्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. लसीकरण झाल्यामुळे कोरोनापासून बचाव होतो आहे. मात्र मध्यप्रदेशमध्ये विद्यार्थ्यांच्या लसीकरणादरम्यान एक धक्कदायक प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशातील सागर येथील शाळेत कोविड-19 लसीकरण मोहिमेदरम्यान ही घटना घडली. एकाच इंजेक्शन सिरिंजने तब्बल 30 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आल्याचा आरोप आहे. सिरिंज बदलली जात नसल्याचे त्यांच्या सोबत आलेल्या मुलांच्या पालकांच्या लक्षात आले आणि त्यांनी आयोजकांकडे तक्रार केली आहे. मोठी बातमी! CLAT परीक्षेसाठीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर; वेबसाईट झाली अपडेट
जितेंद्र राय, एएनएम ज्यांनी विद्यार्थ्यांना इंजेक्शन दिले होते ते म्हणाले की अधिकाऱ्यांनी त्यांना आणखी सिरिंज दिल्या नाहीत. “त्यांनी मला लस देण्यासाठी फक्त एक सिरिंज दिली आणि मला तेच करण्यास सांगितले. म्हणूनच मी एकाच सिरिंजमधून तीस मुलांना लस दिली,” जितेंद्र राय, एएनएम एएनआयला म्हणाले.
लसीकरण महाअभियानाअंतर्गत कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल प्रशासनाने गोपालगंज पोलीस ठाण्यात लसीकरणकर्त्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी दावा करतात की त्यांच्याकडे तक्रारी आल्या आहेत आणि कठोर कारवाईची खात्री केली आहे. “आमच्याकडे तक्रार आली असून, चौकशी सुरू आहे. दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, ”डीके गोस्वामी, सीएमएचओ यांनी एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितलं आहे.
आर्थिक परिस्थितीशी झगडत 21 व्या वर्षी CA बनलेल्या ओमकारनं सांगितला यशाचा मंत्र
एकाच सिरिंजचा पुन्हा वापर केल्याने रुग्णांना हिपॅटायटीस सी, हिपॅटायटीस बी, एचआयव्ही आणि इतर संक्रमणांसह अनेक रोगांचा धोका होऊ शकतो. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 12-14 वर्षे वयोगटातील 3.87 कोटींहून अधिक मुलांना कोविड-19 लसींचा पहिला डोस देण्यात आला आहे. 15-18 वयोगटातील 6.10 कोटींहून अधिक किशोरांना पहिला डोस देण्यात आला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.