पुणे विभागाची पहिली Cut Off लिस्ट जारी
पुणे , 03 ऑगस्ट: राज्यातील विद्यार्थी ज्याची वाट बघत होते तो दिवस आज आला आहे. प्रथम वर्ष ज्युनियर कॉलेज (FYJC) प्रवेशासाठी बहुप्रतिक्षित पहिली कट ऑफ लिस्ट जारी करण्यात आली आहे. पुणे विभागानं ही कट ऑफ लिस्ट जारी केली आहे. सायन्स, कॉमर्स आणि आर्टस् या विषयांमधील प्रवेशासाठी ही कट ऑफ लिस्ट आणि कॉलेजची कट ऑफ लिस्ट (11th admissions cut off list in Pune) जारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यातील विद्यार्थ्यांचा कल हा सायन्स पेक्षा आर्ट्सकडेच अधिक दिसत आहे. तसंच आर्ट्सनंतर सायन्स आणि त्यानंतर कॉमर्सकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. पहिल्या फेरीसाठी पुण्यात 11 वीचे 42 हजार 709 प्रवेश निश्चित झाले आहेत. 11th Admissions: राज्यात अकरावी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट आज होणार जारी? इथे करता येईल चेक या एकूण 42 हजार 709 प्रवेशांपैकी सर्वाधिक प्रवेश हे सायन्समध्ये झाले आहेत. सायन्समध्ये 21,534 विद्यार्थ्यांना कॉलेज अलोट करण्यात आले आहेत. तर आर्टस् विभागात 4197 विद्यार्थ्यांना कॉलेज अलोट करण्यात आले आहेत कॉमर्स या फिल्डमध्ये 16,141 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ विद्यार्थ्यांच्या पसंतीचा विचार केला तर यंदा विद्यार्थ्यांनी यंदा फर्ग्युसन कॉलेजला पसंती दिली आहे. तर यानंतर परशुरामभाऊ जुनिअर कॉलेज आहे. विद्वतार्थ्यांनी सायन्स, कॉमर्स आणि आर्टस् या स्ट्रीमप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ लिस्ट जारी करण्यात आली आहे.
कॉलेजचे नाव | Arts | Commerce | Science |
---|---|---|---|
फर्ग्युसन कॉलेज | 99.60% | .. | 98.60% |
आबासाहेब गरवारे कॉलेज | Marathi= 82% | .. | 97.20% |
सर परशुरामभाऊ ज्यु. कॉलेज | 96.40% | 97.80% | 97.80% |
बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स | .. | 99.60% | .. |
नवरोजजी वाडिया कॉलेज | 91.80% | .. | 95.40% |
नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स | .. | 93.80% | |
डॉ. कलमाडी शमाराव | 94% | 95.80% | 99.20% |
सिम्बॉयसिस कॉलेज | 94.80% | 97.20% | .. |
मॉडर्न जेआर कॉलेज | Marathi= 91.4 | 93.80% | 98.4 |
जय हिंद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय | .. | 94.80% | 96.40% |
इयत्ता 10/SSC परीक्षेच्या उत्कृष्ट निकालामुळे, महाराष्ट्र FYJC कट-ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त असेल असा अंदाज आहे. वेबसाइटने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे 83,060 विद्यार्थ्यांनी 90% आणि त्यापेक्षा जास्त टक्केवारी मिळवली आहे आणि 149221 विद्यार्थ्यांनी 85-90% दरम्यान यश मिळविले आहे.