JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / रस्ते अपघातातील जखमीला रुग्णालयात पोहोचवा आणि 5000 रुपये मिळवा, या दिवसापासून सुरू होणार सरकारची ही योजना

रस्ते अपघातातील जखमीला रुग्णालयात पोहोचवा आणि 5000 रुपये मिळवा, या दिवसापासून सुरू होणार सरकारची ही योजना

रस्ते अपघातात जखमींना Golden Hour अर्थात अपघात झाल्यापासून एक तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला 5000 रुपये बक्षिस म्हणून दिले जाण्याच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) रस्ते अपघातात जखमींना Golden Hour अर्थात अपघात झाल्यापासून एक तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला 5000 रुपये बक्षिस म्हणून दिले जाण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. ही योजना रस्ते अपघातात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी लाँच करण्यात आली आहे. Golden Hour योजना 15 ऑक्टोबर 2021 पासून लागू केली जाईल. मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील परिवहन सचिवांना योजनेशी संबंधित पत्र पाठवण्यात आलं आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवल्यास, मृतांची आकडेवारी अतिशय कमी होऊ शकते. देशात दरवर्षी जवळपास 1.5 लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाने याच उद्देशाने ही योजना लाँच केली आहे. मंत्रालयाने चांगल्या सहकार्यासाठी मदत पुरस्कार देण्याच्या या योजनेसंबंधी निर्देश जारी केले आहेत. या योजनेचा उद्देश रस्ते अपघात झालेल्या व्यक्तीला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवणं हा आहे.

8 लाखांची कार Loanवर घेतली तर भरावे लागतील 10.47लाख; समजून घ्या व्याज दराचं गणित

अशा परिस्थितीत मदत करणाऱ्या व्यक्तीला 5 हजारांसह एक प्रमाणपत्रही दिलं जाईल. त्याशिवाय राष्ट्रीय स्तरावर 10 सर्वात चांगल्या मदतनीसांना एक-एक लाख रुपये हा वेगळा पुरस्कार दिला जाईल.

Driving License बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा, तुम्हाला असा होणार फायदा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या योजनेसाठी स्वतंत्र खातं उघडण्याचं आणि त्याचा तपशील मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरुन मंत्रालय संबंधित राज्यांना 500000 रुपये संबंधित राज्यांना जारी केले जाऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या