नवी दिल्ली, 16 डिसेंबर : Mahindra and Mahindra च्या स्कॉर्पियो कारला अनेकांची मोठी पसंती असते. परंतु याच्या किमतीमुळे, जास्त बजेटमुळे अनेक जण ही कार घेऊ शकत नाहीत. परंतु एका खास डिलमध्ये ही कार निम्म्याहून कमी किमतीत घरी आणता येऊ शकते. स्कॉर्पियो आपल्या सेगमेंटमधली बेस्ट सेलिंग कार आहे. Mahindra Scorpio जर शोरुममधून खरेदी केली, तर त्यासाठी 12.77 लाख ते 17.61 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. परंतु ही कार कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. CarDekho वेबसाइटवर ही कार लिस्टेड असून या वेबसाइटवर याची किंमत 3.8 लाख रुपये आहे. ही एक सेकंड हँड सेगमेंट कार आहे. Mahindra Scorpio SUV ला 2179 cc चं इंजिन देण्यात आलं आहे, जे 120 bhp पॉवर आणि 290 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. परंतु यात इन्शुरन्ससंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
काय आहेत फीचर्स - महिंद्रा स्कॉर्पियोमध्ये एसी, हिटर, अॅडजस्टेबल स्टेअरिंग, रियर वॉश वायपर, पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडो, रिमोट फ्यूल लीड ओपनर, लो फ्यूल वॉर्निंग लाइट, वॅनिटी मिरर, रियर एसी वेंट, पार्किंग सेंसर असे फीचर्स देण्यात आले आहेत.
सेफ्टी फीचर्ससाठी या एसयूवीमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, पॉवर डोर लॉक्स, चाइल्ड सेफ्टी लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, फ्रंट सीटला डुअल एयरबॅग, कीलेस एंट्री सारखे फीचर्स आहेत.
कारदेखो वेबसाइटवर ही कार लिस्टेड असून ही सेकंड हँड कार आहे. त्यामुळे कोणतीही सेकंड हँड गाडी खरेदी करताना त्याबाबत दिलेली माहिती अतिशय काटेकोरपणे तपासणं गरजेचं आहे. कारची कंडिशन आणि त्याचे फोटोही तपासणं आवश्यक आहे. कार घेण्यापूर्वी एकदा सेलरशी भेटून कारची कंडिशन फिजिकली चेक करणं फायद्याचं ठरतं.