नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी: भारतीय स्टील कंपनी जेएसडब्ल्यूने (JSW) मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक गाडी (Electric Vehicle) खरेदी करण्यासाठी 3 लाख रुपयांचा इन्स्टेंटिव्ह (Electric Vehicle Incentive) देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना संपूर्ण भारतात जेएसडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. जेएसडब्ल्यूने JSW ग्रीन इनिशिएटिव्ह प्लॅन (Green Initiative Plan) देशभरात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लाँच केला आहे. यात कर्मचाऱ्यांना कार किंवा टू-व्हिलर वाहन खरेदीसाठी 3 लाख रुपयांचा इन्स्टेंटिव्ह दिला जाईल. फ्री चार्जिंग स्टेशन (Charging Stations) आणि ग्रीन झोनही देणार - कंपनी 3 लाख रुपयांचा इन्स्टेंटिव्ह देण्यासह सर्व JSW ऑफिस आणि कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी प्लांट लोकेशनवर इलेक्ट्रिक गाड्यांसाठी फ्री चार्जिंग स्टेशन आणि ग्रीन झोन पार्किंग स्लॉटही बनवून देणार आहे. देशभरात कंपनीच्या जितक्या ब्राँच आहे किंवा ऑफिस आहेत, त्या सर्व ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्यांचाच वापर होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
JSW ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांनी सांगितलं, कि आपल्या पंतप्रधानांनी ग्लास्गो COP26 च्या बैठकीत घोषणा केली होती, की भारत 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. JSW ग्रुपची नवी योजना इलेक्ट्रिक व्हिकल एक अनोखा उपक्रम आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास वाढ होण्यास मदत होईल. त्याशिवाय भारतात ग्रीन मॉबिलिटीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जबाबदारीने पुढे जात राहू असंही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी हवामान बदलाच्या मुद्द्यावर ब्रिटनच्या ग्लास्गो COP26 च्या बैठकीत सांगितलं होतं, की भारत जगाच्या लोकसंख्येच्या केवळ 17 टक्के प्रतिनिधित्व करतो. परंतु जागतिक कार्बन उत्सर्जनात त्याचा वाटा केवळ 5 टक्के आहे. तरीही भारताने 2015 च्या पॅरिस करारात दिलेल्या आश्वासनांचं प्रमाणिकपणे पालन केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर इन्सेन्टिव देत आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होते. हा इन्सेन्टिव वेगवेगळ्या कॅटेगरीतील गाड्यांनुसार मिळतो. फेम-2 स्कीमअंतर्गत (FAME-II scheme) देण्यात आलेल्या सवलतीमुळे इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या विक्रीत वाढ पाहायला मिळत आहे.