JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Hyundai च्या या Cars वर बंपर डिस्काउंट, पाहा लेटेस्ट ऑफर

Hyundai च्या या Cars वर बंपर डिस्काउंट, पाहा लेटेस्ट ऑफर

या ऑफरमध्ये सँट्रो, (Hyundai Santro), आय 20 (Hyundai i20) आणि ग्रँड आय 10 नियोस (Hyundai Grand i10 Nios) सामिल आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : Hyundai Motor India ने या महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी काही निवडक मॉडेल्सवर डिस्काउंट ऑफरची सुरुवात केली आहे. कोरियाई कार मेकर कंपनी आपल्या पॉप्युलर हॅचबॅक मॉडेलवर सूट देत आहे. या ऑफरमध्ये सँट्रो, (Hyundai Santro), आय 20 (Hyundai i20) आणि ग्रँड आय 10 नियोस (Hyundai Grand i10 Nios) सामिल आहे. Hyundai मोटर इंडियाच्या कार्सवर ही सूट रोख सूट, कॉर्पोरेट बेनिफिट किंवा एक्सचेंज बोनस रुपात दिली जात आहे. ही ऑफर महिन्याच्या अखेरपर्यंत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वॅलिड आहे.

हे वाचा -  जुगाड करून ट्रॅक्टरपासून बनवली नवी जीप; आनंद महिंद्रांना दिली ही ऑफर

Hyundai Grand i10 Nios - Hyundai Grand i10 Nios प्रीमियम हॅचबॅक भारतीय बाजारात कोरियाई कार मेकर्सच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहे. फेब्रुवारीमध्ये Hyundai Grand i10 Nios वर 48000 रुपयांची सूट मिळू शकते. ग्राहकांना हॅचबॅक पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनसह सीएनजी वेरिएंट्ससह उपलब्ध आहे. Hyundai Grand i10 Nios मध्ये ट्रान्समिशन ऑप्शन म्हणून मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गियरबॉक्स मिळतात. Hyundai Grand i10 Nios ची किंमत 5.29 लाख रुपयांपासून 8.51 लाख रुपयांपर्यंत आहे.

हे वाचा -  कारच्या क्रॅश टेस्टद्वारे सेफ्टी रेटिंग कसं दिलं जातं? त्याचे फायदे काय? वाचा

Hyundai Santro - कंपनीच्या सर्वात जुन्या मॉडेलपैकी एक सँट्रोवरही सूट दिली जात आहे. नव्या जनरेशन सँट्रोवर 40000 रुपयांपर्यंतची सूट आहे. ही ऑफर हॅचबॅकच्या पेट्रोल वेरिएंटवर वॅलिड आहे. Hyundai Santro ही 5 सीटर कार असून ज्याला 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्सशी जोडलं गेलं आहे. Hyundai Santro ची किंमत 4.86 लाख रुपयांपासून 6.44 लाख रुपयांपर्यंत आहे.

हे वाचा -  या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित Cars, क्रॅश टेस्टमध्ये मिळालं 5 स्टार रेटिंग

Hyundai i20 - Hyundai i20 च्या या प्रीमियम हॅचबॅकवरही सूट आहे. ही ऑफर केवळ i20 हॅचबॅकच्या डिझेल वेरिएंटवर लागू आहे. Hyundai i20 ची किंमत 6.98 लाखांपासून 11.47 लाख रुपयांपर्यंत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या