JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / तुम्ही कार, बाइक चालवता? हिट अँड रन अपघातात नुकसान भरपाईबाबत सरकारची महत्त्वपूर्ण माहिती

तुम्ही कार, बाइक चालवता? हिट अँड रन अपघातात नुकसान भरपाईबाबत सरकारची महत्त्वपूर्ण माहिती

कार, बाइक चालवणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 मार्च : तुम्ही कार, बाइक (Car Bike Drive) चालवत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कार, बाइक चालवणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry Of Road Transport Highways) महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हिट अँड रन अपघातात (Hit And Run Accident Case) गंभीर जखमी किंवा मृत्यू झाल्यास संबंधितांच्या नुकसान भरपाईबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हिट अँड रन अपघातात गंभीर जखमी झाल्यास नुकसान भरपाई 12500 रुपयांवरुन 50000 रुपये, तसंच या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई 25000 रुपयांवरुन वाढवून 2 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. कधी होणार लागू - 1 एप्रिल 2022 पासून हे लागू होणार असून संपूर्ण भारतातील सर्व रस्ते आणि महामार्गांवर लागू केलं जाईल. त्याशिवाय अपघातग्रस्तांना भरपाई उपचार देण्यासाठी मोटार वाहन अपघात निधी देखील तयार केला जाईल. यामुळे आर्थिक दुर्बल असलेल्या लोकांना आणि कुटुंबांना मदत होईल.

हे वाचा -  जुन्या Car मध्ये CNG किट बसवताय? या गोष्टीकडे लक्ष द्या नाहीतर होईल मोठं नुकसान

दरम्यान, आपल्या देशात रस्ते अपघात (Road Accidents) आणि त्यात जाणारे बळी यांचे प्रमाण प्रचंड आहे. रस्ते अपघातांमागे मुख्य कारण असते ते बेदरकारपणे नियम न पाळता वाहन चालवणे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही (Mumbai) रस्ते अपघातांचे आणि वाहतूक कोंडीचे (Traffic Jam) प्रमाण वाढत असल्यानं वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे (Police Commissioner of Mumbai Sanjay Pandey) यांनी कठोर पाऊल उचलले आहे. आता मुंबईत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना शिक्षा करण्यात येणार असून, चुकीच्या किंवा विरुद्ध बाजूने (Wrong Side Driving) गाडी चालवल्यास एफआयआर (FIR) म्हणजे प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात येणार आहे. ‘चुकीच्या दिशेने गाडी चालवताना पकडलेल्यांवर भारतीय दंड संहिता किंवा मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला जाईल,’ असं पांडे यांनी सांगितलं. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचं वाहन जप्त केलं जाईल आणि त्यांना न्यायालयात हजर राहावं लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या