नवी दिल्ली, 16 डिसेंबर : भारतात टू-व्हिलर सेगमेंट अतिशय मोठं आहे. परंतु अशा काही चांगल्या मायलेज असणाऱ्या मोटरसायकल आहेत, ज्या खरेदी केल्यानंतर युजर्स 2 रुपयांहूनही कमी किंमतीत 1 किलोमीटरपर्यंत बाइक चालवू शकतात. म्हणजेच जर तुम्ही 70 किलोमीटरपर्यंत जात असाल, तर तुम्हाला जवळपास 100 रुपये पेट्रोल खर्च करावा लागेल. Hero Splendor Plus - Hero च्या या बाइकमध्ये 97.2 cc चं इंजिन देण्यात आलं आहे. पेट्रोलवर चालणारी ही बाइक 8000 rpm 7.91 bhp पॉवर आणि 6000 rpm वर 8.05 nm टॉर्क जनरेट करते. या बाइकला सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं असून बाइक 62 kmpl मायलेज देते. Hero Splendor Plus ची किंमत 64,850 रुपये आहे.
TVS Raider 125 - टीव्हीएसची ही बाइक 124.8 cc इंजिनसह येते. ही बाइक 60 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. ही बाइक 7500 rpm वर 11.2 bhp पॉवर देते. यात BS 6 इंजिन मिळतं.
Honda CD 110 Dream - होंडाची ही बाइक 64.5 kmpl मायलेज देते. यात 109.51 cc इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 7500 rpm वर 8.67 bhp पॉवर देतं आणि 5500 rpm वर 9.30 nm टॉर्क जनरेट करतं. यात BS 6 इंजिन देण्यात आलं असून या बाइकची ऑनरोड किंमत 76,629 रुपये आहे.
Bajaj Platina 100 - Bajaj Platina 100 ची ऑनरोड किंमत 62 हजार रुपये आहे. यात 102 cc इंजिन, 7500 rpm वर 7.9 bhp पॉवर आणि 5500 rpm वर 8.34 nm टॉर्क जनरेट करू शकते. ही बाइक 72 kmpl मायलेज देते.