JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद / कर्ज काढून मॅनेजरला दिले पैसे पण...; फसवणूक झाल्यानं औरंगाबादेतील तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

कर्ज काढून मॅनेजरला दिले पैसे पण...; फसवणूक झाल्यानं औरंगाबादेतील तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Suicide in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा येथील एका 24 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट (Social media post) टाकत आत्महत्या केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 17 ऑक्टोबर: औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा येथील एका 24 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट (Social media post) टाकत आत्महत्या (Suicide) केली आहे. संबंधित तरुण हा औरंगाबाद येथील बजाज ऑटो कंपनी अंतर्गत येणाऱ्या नील ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत होता. येथील एका मॅनेजरने पगारवाढ आणि प्रमोशन (lure of Salary increment and promotion)देतो असं सागून मृत तरुणाकडून 80 हजार रुपये घेतले (Fraud rs 80,000) होते. पण आरोपी मॅनेजरने दोन वर्षांपासून पैसे घेऊनही पगारवाढीसह प्रमोशन दिलं नाही. यामुळे संबंधित तरुण आर्थिक विवंचनेत सापडला. यातूनच हवालदिल झालेल्या तरुणाने शनिवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. शिवनाथ सखाराम कोलते असं आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो औरंगाबाद येथील नील ऑटो प्रा. लि. या कंपनीत गेल्या काही वर्षांपासून काम करत होता. दरम्यान, कंपनीतील मॅनेजर मनोज पवार याने शिवनाथला प्रमोशन आणि पगारवाढ देण्याचं आमिष दाखवलं. त्यासाठी आरोपीनं शिवनाथकडे 80 हजार रुपयांची मागणी केली. प्रमोशन आणि पगारवाढीच्या आमिषाला बळी पडून शिवनाथनं  व्याजाने कर्ज घेऊन 80 हजार रुपये आरोपी मॅनेजरला दिले. हेही वाचा- दसऱ्याच्या दिवशीच हिरावले बहीण-भाऊ; भीषण अपघातात चिमुकल्या भाचीसह तिघांचा अंत दोन वर्षे उलटूनही मॅनेजरने त्याला पगारवाढ दिली नाही. दुसरीकडे कर्जाने घेतलेल्या 80 हजार रुपयांचं व्याज दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. तसेच देणेकऱ्यांकडून पैशांसाठी तगादा लावण्यात येत होता. यामुळे 24 वर्षीय शिवनाथ आर्थिक विवंचनेत सापडला होता. अशातच शिवनाथने सोशल मीडियावर पोस्ट लिहून शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हेही वाचा- मोबाइल न दिल्याने पत्नीची सटकली; विळ्याने नवऱ्याचे ओठ कापून घेतला बदला आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये शिवनाथने म्हटलं की, ‘माझ्या आत्महत्येसाठी कंपनीतील मॅनेजर मनोज पवार हे कारणीभूत असतील. ते मला मागील दोन वर्षांपासून पगारवाढ आणि प्रमोशनचं आश्वासन देत होते.’ शिवनाथने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच, कंपनीतील अन्य कर्मचाऱ्यांनी मॅनेजर विरोधात संताप व्यक्त केला आहे. आरोपीवर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कंपनीतील कामगार संघटनेनं घेतला आहे. यानंतर कामगारांनी काही काळ रास्ता रोको देखील केला. आरोपी मॅनेजर मनोज पवार सध्या फरार असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या