JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद / अस्मानी संकटाने हाता-तोंडाचा घास हिरावला; औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं

अस्मानी संकटाने हाता-तोंडाचा घास हिरावला; औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं

Suicide in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

जाहिरात

कैलास पुंडलिक काटकर असं आत्महत्या करणाऱ्या 36 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. (फोटो-दिव्य मराठी)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

खामगाव, 18 ऑक्टोबर: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका तरुण शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून गळफास घेत आत्महत्या (Farmer suicide) केली आहे. सलग दोन वर्षे अस्मानी संकटाने हाता-तोंडाला आलेला घास हिरावून घेतल्याने तरुणावर कर्जांचा डोंगर निर्माण झाला होता. सावकारांचं कर्ज कसं द्यायचं.याची चिंता त्याला सतावत होती. त्यातूनच संबंधित तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातील एका झाडाला गळफास घेत मृत्यूला कवटाळलं आहे. या घटनेची माहिती मिळताच वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. हेही वाचा- जुळ्या भावांसाठी रविवारची रात्र ठरली काळरात्र; 25 व्या मजल्यावरून पडून झाला अंत कैलास पुंडलिक काटकर असं आत्महत्या करणाऱ्या 36 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथील रहिवासी आहेत. खामगाव शिवारात त्यांची शेती असून त्यांच्या नावावर वि.वि.का सोसायटीच्या कर्जासह, खाजगी फायनान्सचं गृहकर्ज होतं. तसेच काही खाजगी सावकाराकडून देखील त्यांनी उधार पैसे घेतले होते. पण गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून डोक्यावरील कर्ज कसं फेडायचं याची चिंता त्यांना सतावत होती. हेही वाचा- दसऱ्याच्या दिवशीच एकुलता एक मुलगा बनला राक्षस; आईसोबतच्या कृत्यानं पुणे हादरलं! यावर्षी देखील मराठवाड्यात कोसळलेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसात त्याचं पीक वाहून गेलं होतं. हाता-तोंडाला आलेला घास अशाप्रकारे हिरावल्याने कैलास हे हवालदिल झाले होता. अस्मानी संकटामुळे सततच्या होणाऱ्या नुकसानीमुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या कैलास काटकर यांनी खामगाव शिवारातील शेतात झाडाला गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या