JOIN US
मराठी बातम्या / राशीभविष्य / Money Mantra - 2 नोव्हेंबर 2022 रोजीचं आर्थिक राशिभविष्य

Money Mantra - 2 नोव्हेंबर 2022 रोजीचं आर्थिक राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं 02 नोव्हेंबर, 2022 राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

जाहिरात

आर्थिक राशिभविष्य.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (2 नोव्हेंबर 2022) राशिभविष्य मेष (Aries) : बिझनेसमधल्या नव्या व्यक्तींशी नातेसंबंध तयार होतील. त्यातून तुमची प्रगती होत राहील. कष्टांनुसार रिझल्ट्स मिळतील. संबंधित कामात यश मिळेल. उपाय : श्री सरस्वती देवीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा. वृषभ (Taurus) : तुमच्या वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. ऑफिसमध्ये अपेक्षित रिझल्ट्स मिळतील. प्रत्येकाकडून सहकार्य, पाठिंबा मिळेल. करिअर बिझनेसमध्ये स्पर्धा राखाल. महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होईल. प्रोफेशनल उद्दिष्टं साध्य होतील. सर्व जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडाल. बिझनेस अधिक मजबूत होईल. उपाय : श्रीरामाच्या मंदिरात ध्वज अर्पण करा. मिथुन (Gemini) : कर्ज घेणं किंवा देणं टाळा, अन्यथा तोटा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कट्टरता, हट्टीपणा टाळा. बिझनेसविषयक कृतींमध्ये दक्षता बाळगाल. बिझनेस अधिक व्यापक करण्यासाठी लक्ष केंद्रित कराल. प्रोफेशनॅलिझम पाळा. जुनी प्रकरणं पुन्हा वर येऊ शकतील. गुंतवणुकीबाबत रस घ्याल. उपाय : श्री हनुमानाच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा. कर्क (Cancer) : प्रोफेशनल अचीव्हमेंट्समध्ये वाढ होईल. करिअर बिझनेसमध्ये मांगल्य वाढेल. सिस्टीम मॅनेजमेंट मजबूत राहील. आर्थिक समस्या सोडवल्या जातील. योग्य दिशेने वाटचाल कराल. धैर्य वाढेल. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहा. नव्या कामांमध्ये रस घ्याल. इंडस्ट्री ट्रेडमध्ये सुधारणा होईल. उपाय : भगवान शिवशंकराला जल अर्पण करा. सिंह (Leo) : आर्थिक बाबींमध्ये प्रगती होईल. बचत कराल. करिअर बिझनेससाठी कष्ट घ्याल. संपत्ती वाढेल. बिझनेस वृद्धिंगत होईल. कामाच्या परिस्थितीत सकारात्मकता वाढेल. पुढे वाटचाल करण्यास कचरू नका. नफ्याची टक्केवारी चांगली असेल. अनुरूपता वाढेल. उपाय : श्री भैरव मंदिरात नारळ अर्पण करा. कन्या (Virgo) : बिझनेसमध्ये संकोच कमी असेल. इच्छित यशप्राप्ती होईल. बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीज वाढतील. वस्तूंची आणि कल्पनांची देवाणघेवाण वाढेल. प्रोफेशनल्सना प्रवास घडेल. कामात हलगर्जीपणा टाळा. उपाय : गायींना हिरवा चारा खाऊ घाला. तूळ (Libra) : ऑफिसचं काम गंभीरपणे घ्या. सहकारी मदत करतील. गुंतवणुकीबद्दल कसल्याही मोहात पडणं टाळायला हवं. करिअर बिझनेस सकारात्मक असेल. कुटुंबीयांचा पाठिंबा, सहकार्य मिळेल. सक्रियपणे काम कराल. वंशपरंपरागत बिझनेसमध्ये प्रभावी ठराल. उपाय : पिवळ्या रंगाचा खाद्यपदार्थ दान करा. वृश्चिक (Scorpio) : जीवनातली आवश्यक कामं वेगाने कराल. आत्मविश्वास प्राप्त कराल. आर्थिक ताकद कायम राहील. चांगल्या ऑफर्स मिळतील. करिअर बिझनेसमध्ये लक्ष केंद्रित कराल. नफ्याची टक्केवारी उत्तम असेल. उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा. धनू (Sagittarius) : गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या घोटाळ्याला बळी पडण्यापासून सावध राहा. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. इंटरव्ह्यूच्या वेळी सावध राहा. गरजेच्या डील्समुळे करारामधल्या संयमात वाढ होईल. भास ओळखा. निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. सिस्टीमवर विश्वास ठेवा. सहकाऱ्यांचा विश्वास जिंका. परिस्थिती सर्वसाधारण राहील. उपाय : श्री हनुमान चालिसा पठण करा. मकर (Capricorn) : बिझनेस पार्टनरशिपमधली प्रकरणं तुम्हाला अनुकूल असतील. प्रोफेशनल अचीव्हमेंट्समध्ये वाढ होईल. अधिकारी आनंदी असतील. मोठा विचार कराल. मोठे उद्योग बिझनेसशी जोडले जातील. नेतृत्वगुणाची जाणीव होईल. जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडाल. आर्थिक लाभ उत्तम असतील. कामात स्पष्टता असेल. उपाय : भगवान शिवशंकरांना पंचामृताने अभिषेक करा. कुंभ (Aquarius) : सिस्टिमॅटिक कन्फ्युजन कायम राहण्याची शक्यता आहे. वैयक्तिक बाबींमध्ये कम्फर्टेबल असाल. आर्थिक बाबी संमिश्र असतील. दृष्टिकोन कायम ठेवा. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स टाळा. संशोधनात सहभागी व्हा. कामातला संयम वाढेल. करिअर बिझनेस संमिश्र असेल. गरजेचे निर्णय घेण्यात उशीर करू नका. उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा. मीन (Pisces) : आर्थिक प्रगतीसाठीच्या संधी वाढतील. विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी कराल. प्रोफेशनॅलिझम राखाल. नवी नोकरी सुरू करू शकाल. पीअर्सवरचा विश्वास वाढेल. स्पर्धेत प्रभावी ठराल. कॉमर्स विषयांत रस घ्याल. बिझनेसमध्ये करिअरची गती राखली जाईल. उपाय : घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या