13 एप्रिलचे आर्थिक राशिभविष्य
मेष (Aries) : बिझनेसमध्ये नव्या अचीव्हमेंट्स साध्य होतील. त्यामुळे कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. विरोधकांचे प्लॅन्स अयशस्वी ठरतील. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आवश्यक आहे. उपाय : गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा. वृषभ (Taurus) : बिझनेसमध्ये आव्हानं असतील. स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक कष्ट करण्याची गरज आहे. गांभीर्याने काम केल्यास तुम्ही समस्या सोडवू शकाल. उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा. मिथुन (Gemini) : बिझनेसच्या कामात समस्या राहतील. तुमची कामं नियोजनबद्ध रीतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कर्मचाऱ्याच्या गॉसिपवर विश्वास ठेवू नका. तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. उपाय : श्री हनुमानाला नारळ अर्पण करा. कर्क (Cancer) : बिझनेसच्या विस्तारीकरणाच्या प्लॅनवर गांभीर्याने काम करा. या वेळी ग्रहस्थिती अनुकूल आहे. मार्केटिंग आणि जनसंपर्कची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. ऑफिसचं काम घरीही करावं लागेल. उपाय : दुर्गा मातेला लाल ओढणी अर्पण करा. सिंह (Leo) : बिझनेसमध्ये खूप गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. या वेळी तुमच्या विस्तारीकरणाच्या योजनेचा फेरविचार करा. कोणताही छोटा किंवा मोठा निर्णय घेण्यापूर्वी कोणाचा तरी सल्ला किंवा मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. उपाय : लहान मुलींना खीर खायला द्या.
कन्या (Virgo) : बिझनेसशी संबंधित कोणतीही कार्यपद्धती फायद्याची राहील. त्याचे परिणाम चांगले मिळतील. प्रॉपर्टीशी निगडित बिझनेसमध्ये मोठं डील मिळू शकेल. बेदरकारपणा आणि उदारपणा बिझनेसमध्ये धोकादायक ठरू शकेल. या वेळी लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. उपाय : केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. तूळ (Libra) : पेमेंट किंवा कर्जाऊ घेतलेले पैसे आज परत करू शकता. कामाच्या क्षेत्रात तुमची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. लोकांशी संपर्क दृढ होतील. ऑफिसमध्ये फाइल वर्क करताना चूक होण्याची शक्यता आहे. उपाय : श्री लक्ष्मीमातेला कमळाचं फूल अर्पण करा. हे वाचा - एका ताऱ्यानं केला खोळंबा! अक्षय्य तृतीयेला यंदा नाही वाजू शकणार सणई-चौघडे वृश्चिक (Scorpio) : बिझनेसमध्ये विस्ताराचे प्लॅन्स फलदायी होण्यासाठी ही योग्य वेळ आहे. सरकारी कामाशी निगडित कोणत्याही कागदपत्रावर न वाचता सही करू नका. प्रवासाची ऑफिशियल सूचना प्राप्त होऊ शकेल. उपाय : तेलात तळलेली इमरती काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. धनू (Sagittarius) : प्लॅन्सवर काम करण्यासाठी काळ अनुकूल आहे. नवं कामही सुरू होऊ शकेल. नोकरदार व्यक्तींनी अधिकाऱ्यांशी चांगले नातेसंबंध ठेवले पाहिजेत. प्रमोशनच्या संधी तयार होत आहेत. उपाय : शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीची सेवा करा. हे वाचा - तुळशीची 11 पाने बदलतील तुमचे नशीब, मनातील अपूर्ण इच्छा क्षणात होईल पूर्ण मकर (Capricorn) : भागीदारी व्यवसायात सलोखा राखा. त्यामुळे तुमच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकेल. बिझनेसमध्ये मोठं डील किंवा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे काँटॅक्ट सोर्सेस आणखी मजबूत करा. जोखमीच्या कामात रस घेऊ नका. उपाय : पिठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला. कुंभ (Aquarius) : बिझनेसच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित माहिती उपलब्ध होईल. नवी मशिनरी किंवा नवं तंत्रज्ञान वापरण्यात यश मिळेल. या वेळी एखादी नवी अचीव्हमेंट्सही साध्य होऊ शकेल. उपाय : माशांना खाऊ घाला. हे वाचा - गुटर गूं.. करत घरात, खिडकीत कबूतर येण्याचा अर्थ? भविष्यातील कशाचे ते संकेत मीन (Pisces) : बिझनेसशी संबंधित प्रोजेक्टमध्ये समस्या उद्भवू शकतात; मात्र तुम्ही त्या अगदी चांगल्या रीतीने हाताळू शकाल. या वेळी बिझनेसमध्ये उत्पादन आणि मार्केटिंगशी निगडित कामांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. उपाय : सूर्यदेवाची पूजा/आराधना करा.