राशिभविष्य.
सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) काहीसा गोंधळाचा दिवस. तुमच्या मनात अनेक विचार असतील. प्राधान्यक्रमाची यादी तयार करा. जुन्या मित्राशी बोलल्यामुळे आवश्यक असलेला दिलासा मिळेल. LUCKY SIGN - A copper vessel वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) अलीकडेच गमावलेल्या एखाद्यासाठी तुम्ही काही तरी केलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या तुमच्याकडून अनेक अपेक्षा असतील आणि तुमच्या कामगिरीत उणीव असू शकेल. नवी संधी दार ठोठावण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A salt lamp मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) कशाला तरी घाबरून दिवसाची सुरुवात होईल; मात्र तुमच्या निर्धारामुळे तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर याल. लवकरच तुमच्या हातात नवा प्रकल्प असेल. तुम्ही पूर्वी ज्याच्या/जिच्या प्रेमात पडला होतात, ती व्यक्ती कदाचित परतण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A blue bottle कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) काहीच बातमी नसणं ही चांगली बातमी असू शकेल; मात्र तुम्ही दोनदा तपासून खात्री केली पाहिजे. अति आत्मविश्वास ही समस्या असू शकते. त्यामुळे आज त्यावर बारकाईने लक्ष ठेवा. एखादं जुनं संभाषण समोर येऊ शकेल आणि ते अनुकूल नसेल. LUCKY SIGN - A white flag सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) दूरवरून पाहून कोणी तरी चांगल्या हेतूने तुमचं कौतुक करत असण्याची शक्यता आहे. भूतकाळातला एखादा छंद पुन्हा आठवण्याची शक्यता आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचं संतुलन साधण्यासाठी तुम्हाला कदाचित थोडा संघर्ष करावा लागेल. LUCKY SIGN - A walking stick कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) एखाद्या छोट्या ट्रिपचे संकेत आहेत. चांगली बातमीही मिळू शकेल. कामाच्या ठिकाणची एखादी व्यक्ती आपली काळजी व्यक्त करील. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्यापासून तुम्ही कदाचित अंग काढून घ्याल. LUCKY SIGN - Water lilies तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे परिणाम आता दिसतील. तुमच्या कामगिरीची दखल घेतली जाईल. प्रेम असलेली व्यक्ती ते व्यक्त करण्याची शक्यता आहे आणि ते तुमच्यासाठी अनपेक्षित असेल. तुमच्या आईच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं लागू शकेल. LUCKY SIGN - Silver vessel वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) आज काही महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ रिलॅक्स व्हावं, असं वाटेल. तुमचा आजचा दिवस अगदी साधा-सरळ असेल. जर्नलमध्ये व्यक्त होणं किंवा पत्र लिहिणं यांमुळे दिलासा मिळू शकेल. LUCKY SIGN - A white rose धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) दिवसाची सुरुवात थोड्या गोंधळाने होईल; मात्र दुपारपर्यंत तो उत्तम होईल. मित्राकडून सरप्राइज व्हिजिट दिली जाईल. तुम्ही अचानक एखादा प्लॅन ठरवाल. गुंतवणूक आता तुम्हाला तातडीने काही परतावा देण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A silk drape मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) काही नैसर्गिक इच्छा असेल, तर ती तुम्ही तिचं नक्की ऐकलं पाहिजे. काही व्यक्ती त्याविरुद्धचा सल्लाही देतील. सध्याच्या परिस्थितीत तुमच्याकडे निर्णयकौशल्य असणं गरजेचं आहे. बराच काळ मनोरंजनात रमून राहणं सध्यासाठी चांगलं नाही. LUCKY SIGN - A climber कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) एखाद्या नव्या रूटीन प्रॅक्टिससाठी तुम्हाला जागा करावी लागेल. हळूहळू करत जाणं उत्तम. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं काही करण्याचा विचार करत असलात, तर सध्या त्यासाठी चांगला काळ आहे. काही काळ तुम्हाला कदाचित वक्तशीरपणा पाळायला जमणार नाही. LUCKY SIGN - A fish painting मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखाद्या भावनेसह बराच काळ राहणं योग्य नाही. आयुष्यात नव्या काही व्यक्ती आणि नव्या गोष्टींकडे वळाल. वयस्कर, मात्र यशस्वी सहकारी मदत करील. मनोरंजनाची एखादी कृती पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A novel