13 ऑगस्ट 2022 रोजीचं राशिभविष्य.
सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 13 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आजचा दिवस तुमच्या नियोजनापेक्षा जास्त बिझी असेल. एखाद्या किचकट कामात दिवसाचा बराचसा वेळ जाईल. आज खाण्याच्या बाबतीत नियंत्रण गरजेचं. जास्त खाणं टाळा. आवश्यक नसेल तर कोणत्याही बाबतीत कमिटमेंट टाळा. LUCKY SIGN – A Jasmine Flower वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) दिवसाची सुरुवात आळसाने झाली, तरी दुपारनंतर वेग येईल. एखादा जवळचा मित्र चांगली बातमी सांगेल. तुम्ही आतापर्यंत टाळत असलेली गोष्ट आता करावी लागेल, हे लक्षात घ्या. LUCKY SIGN – A Lemon Fragrance मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) आज आर्थिक फायदा संभवतो. अडकलेले पैसे मिळू शकतील किंवा नवीन गोष्टींमध्ये लाभ होईल. तुमच्या मुलांची संगत कशी आहे, याची तपासणी करण्याची गरज आहे. एक ब्रेक घेण्याची शक्यता. LUCKY SIGN – Two Squirrels कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही आधी ठरवलेल्या गोष्टी वेळेवर पार पडतील. एकतर्फी संबंधांना आता अर्थ उरणार नाही. आजचा दिवस ताणाचा, मात्र फायद्याचा राहील. विशेषतः सरकारी आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना हे दिसून येईल. LUCKY SIGN – An Eagle सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुमच्या मताला आज किंमत असेल. प्रगतीसाठी तुम्हाला एक व्यासपीठ उपलब्ध होईल. रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या जोडीदाराला एखाद्या कामासाठी तातडीने तुमची गरज भासेल. LUCKY SIGN – A Notice Board कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमच्या इच्छांबाबत ठाम राहा आणि त्यातून जे काही समोर येणार आहे ते स्वीकारण्यास तयार राहा. तुमच्या काही कामांबद्दल तुम्हाला जज केलं जाईल. आकर्षक व्यक्तिमत्त्वाची एखादी व्यक्ती भेटेल. अचानक एखादा प्रवासाचा बेत आखाल. LUCKY SIGN – A Yellow Sapphire तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) आजचा दिवस जवळपास सर्वोत्कृष्ट आहे. त्याचा फायदा तुम्ही घ्यायलाच हवा. नियोजनबद्ध राहा आणि स्वत:चं कुतुहल जागं ठेवा. तुम्ही सध्या योग्य आणि निश्चित मार्गावर आहात. कौटुंबिक सहल किंवा मित्रांसोबत जेवणाचा बेत आखला जाऊ शकतो. LUCKY SIGN – A New Gadget वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) एखादा नवीन छंद तुमचा बराच वेळ व्यापेल. नुकतीच भेट झालेल्या एखाद्या व्यक्तीवर तुम्ही भरपूर विश्वास ठेवाल. मनातल्या गोंधळामुळे ताण जाणवेल. नेटकेपणा जपण्यासाठी तुमच्या दिनचर्येत बदल करा. LUCKY SIGN – A String of Lights धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) वेळेपूर्वीच एखाद्या बाबतीत बोलणी करू नका. संयम बाळगणं गरजेचं आहे. तुमच्या हेतूंना पाठिंबा मिळतो; मात्र ते योग्य प्रकारे मांडणं गरजेचं आहे. शेजारची एखादी व्यक्ती अडथळा निर्माण करील. LUCKY SIGN – A Vanilla Fragrance मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमचे हेतू चांगल्या दिशेने निश्चित करण्याचा आजचा दिवस आहे. एखादी कृती करण्याबाबत तुमच्याकडे बऱ्याच दिवसांपासून चौकशी सुरू आहे आणि आता कृतीची वेळ आली आहे. तुमच्या मनातली भीती बाजूला ठेवून समोरचं नवीन आव्हान स्वीकारा. आज साधेपणाने काम करत राहा. LUCKY SIGN – An Indoor Plant कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) सुख-समाधान हळूहळू तुमच्या दिशेने येत आहे. नवीन संकल्पनांचा आणि विचारांचा स्वीकार करत राहा. तुम्हाला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल; मात्र तुम्ही नेटकेपणाने ते कराल. LUCKY SIGN – A Clear Sky मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमची भीती सत्यात उतरतं आहे असं वाटेल; मात्र त्यावर आरामात मात कराल. कामाच्या ठिकाणी मिळणारी मदत आणि आधार तपासण्याची गरज भासेल. लवकरच एखादी नवीन संधी उपलब्ध होईल. LUCKY SIGN – A Bunch of Flowers