अहमदनगर, 18 मे : मित्रांसोबत पैज लागलेल्या मित्राला ही पैज अंगलट आल्याचा प्रकार घडला आहे. पोहण्यासाठी गेलेल्या या तरुणाचा मृत्यू (Young Man Died During Swim) झाला आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात (Chincholi Kaldat Karjat) पासून दोन किलोमीटर अंतरावरील खाणीमध्ये ही घटना घडली. दत्ता झुंबर उबाळे असे मृताचे नाव आहे. मित्रांसोबत लावलेली पैज आली अंगलट - मृत दत्ता झुंबर उबाळे हा आपल्या चार मित्रांसोबत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खाणीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. मित्रांसोबत पैज लागलेल्या मित्राला ही पैज अंगलट आला. पोहण्यासाठी गेलेला हा तरुण पाण्यातच खोल गेला. आणि पोहताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच चिंचोली काळदात येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस आणि तहसिलदार यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. हेही वाचा - ‘पत्नी नीट साडी ही नेसत नाही’, चिठ्ठी लिहित पतीनं उचललं धक्कादायक पाऊल
पाण्याची खाण 20 ते 25 फुट खोल -
मृतदेह बाहेर काढण्यासाठी शोध यंत्रणेशी संपर्क करण्यात आला. मात्र, दगडी खाण ही एक एकरापेक्षा जास्त मोठी आहे. तसेच 20 ते 25 फूट खोल पाण्याने ती भरलेली आहे. यामुळे मृतदेह सापडण्यास अडचणी येत आहेत. काही स्थानिक पोहणाऱ्या युवकांनी पाण्यामध्ये उडी घेऊन शोधाशोध केली. मात्र, त्यांनाही अपयश आले आहे. यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी नाशिक येथून पाणबुडी मागवण्यात आली आहे. शोधकार्य सुरू आहे.