अहमदनगर, 06 मे: अहमदनगरमध्ये (Ahmednagar) भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोपरगाव तालुक्यात हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. कंटेनरची रिक्षाला धडक बसल्यानं ही दुर्देवी घटना घडली आहे.
पोहेगाव कोपरगाव रोडवर हा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अपघातात एकूण दहा जण गंभीर जखमी झालेत. त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या अपघातात झालेल्या चार जखमींवर जनार्दन स्वामी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
तर 6 जणांचे मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये 2 महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा समावेश आहे.
तसंच मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा मृत्यू झाला आहे. एकूण सहा जणांचा मृत्यू तर चार जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळतेय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Ahmednagar News