मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /शिक्षिकेचे अश्लील फोटो बनवून केले व्हायरल; अहमदनगरमधील अल्पवयीन विद्यार्थ्यांचा कांड

शिक्षिकेचे अश्लील फोटो बनवून केले व्हायरल; अहमदनगरमधील अल्पवयीन विद्यार्थ्यांचा कांड

Cyber Crime in Ahmednagar: अहमदनगरमध्ये काही अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेचे फोटो मॉर्फ (Female teacher's morph photos viral) करत सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

Cyber Crime in Ahmednagar: अहमदनगरमध्ये काही अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेचे फोटो मॉर्फ (Female teacher's morph photos viral) करत सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

Cyber Crime in Ahmednagar: अहमदनगरमध्ये काही अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेचे फोटो मॉर्फ (Female teacher's morph photos viral) करत सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

अहमदनगर, 28 सप्टेंबर: मुंबई येथील धारावी परिसरातील एका इंग्रजी माध्यामाच्या शाळेचे ऑनलाइन क्लास सुरू असताना अश्लील व्हिडीओ (Porn video played during online class) लावल्याची घटना ताजी असताना, आता अहमदनगरमध्ये काही अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेचे फोटो मॉर्फ (Female teacher's morph photos viral) करत सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, संबंधित कृत्य विद्यार्थ्यांनीच केल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात अशाप्रकारच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत पोलीस याचा तपास करत आहेत.

खरंतर, मागील जवळपास पावणे दोन वर्षांपासून देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. याचा सर्वाधित परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. पण विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे अनेक अल्पवयीन विद्यार्थ्यांकडे इंटरनेट आणि स्मार्टफोन उपलब्ध झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांकडून या फोनचा वापर गैरप्रकार करण्यासाठी वापरले जाऊ लागले आहेत.

हेही वाचा- नागपूर: एकतर्फी प्रेमातून वर्गमित्राचं विकृत कृत्य; 2 लेकराच्या आईला किचनमध्ये डांबलं अन्...

असाच एक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित शाळेत घडला आहे. काही विद्यार्थ्यांनी एका शिक्षिकेचे फोटो मॉर्फ करून त्याचं रुपांतर अश्लील फोटोंमध्ये केलं आहे. विद्यार्थी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी हे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. त्याच बरोबर शिक्षिकेला वारंवार व्हिडीओ कॉल करत अश्लील कृत्य केलं जात होतं. दुसऱ्या एका शाळेत काही विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचा मोबाइल नंबर पॉर्न वेबसाइट्सवर अपलोड केला होता.

हेही वाचा-हृदयद्रावक: पत्नीचे हट्ट पुरवायला कमी पडला गरीब पती; विवाहितेनं उचललं भयावह पाऊल

याप्रकरणी पीडित शिक्षिकांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता, संबंधित गुन्हे करणारे दुसरी तिसरे कोणी नसून ओळखीचेच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थी असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी संबंधित आरोपी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं असून घटनेची पुढील चौकशी केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Ahmednagar, Crime news