अहमदनगर, 18 ऑक्टोबर: शेजारी राहणाऱ्या लोकांसोबत कधी आणि कोणत्या कारणातून वाद होईल, हे काही सांगता येत नाही. किरकोळ कारणावरून झालेले वाद अनेकदा विकोपाला जातात. ज्यातून खुनाच्या घटना देखील घडतात. अशीच एक घटना अहमदनगर येथील वाळकी परिसरात घडली आहे. येथील शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबीयांमध्ये सायकल पार्क करण्यावरून वाद (hassle over bicycle parking) झाला होता. पण वाद विकोपाला गेल्यानंतर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने भांडणाचा रक्तरंजित शेवट केला आहे.
आरोपीनं डोक्यात दगड घालून एका 35 वर्षीय तरुणाची हत्या (neighbor hit with stone and murdered) केली आहे. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर, शेजारील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.
हेही वाचा-पुण्यातील IT अभियंत्याकडून उच्च शिक्षित तरुणीला दगा; लॉजवर बोलावून केला घात
जावेद गनीभाई तांबोळी असं हत्या झालेल्या 35 वर्षीय युवकाचं नाव आहे. तो अहमदनगर येथील वाळकी परिसरातील रहिवासी आहे. त्याचं मागील काही दिवसांपासून आपल्या शेजाऱ्यासोबत किरकोळ कारणातून वाद सुरू होता. दरम्यान, सायकल पार्क करण्यावरून जावेद तांबोळी यांचा शेजाऱ्यांसोबत वाद झाला होता. या वादातून शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने जावेद यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण पद्धतीने हत्या केली आहे. ही घटना नगर तालुक्यातील वाळकी येथील स्टेट बँकेसमोर चौकात घडली.
हेही वाचा-'बायको लवकर घरी ये, भांडायला जायचंय', नकार दिल्याने चाकू भोकसून पत्नीचा खेळ खल्लास
ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच शेजाऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.