मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

पोलीस उपअधिक्षकांवर निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा गोळीबार, अहमदनगरमधील धक्कादायक घटना

पोलीस उपअधिक्षकांवर निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा गोळीबार, अहमदनगरमधील धक्कादायक घटना

पोलीस उपअधिक्षकांवर गोळीबार, निलंबित पोलीस अधिकाऱ्यानेच केला हल्ला (प्रातिनिधिक फोटो)

पोलीस उपअधिक्षकांवर गोळीबार, निलंबित पोलीस अधिकाऱ्यानेच केला हल्ला (प्रातिनिधिक फोटो)

Firing on police officer in Ahmednagar: एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे.

अहमदनगर, 7 ऑक्टोबर : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar district) राहुरी (Rahuri) येथे बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याने पोलीस उपअधीक्षकावर गोळी झाडल्याची घटना (firing on dysp by suspended policemen) घडली आहे. सुदैवाने हा हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागली नाही आणि दुखापतही झालेली नाहीये. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे याच्या विरुद्ध राहुरी तालुक्यातील महिलेच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल केल्या नंतर यासंदर्भात पीडित महिलेने जबाब दिल्यास आणखी अडचणी निर्माण होण्याची भीती बडतर्फ पोलीस अधिकारी लोखंडे यांच्या मनात आल्याने आज सकाळी लोखंडे पीडित महिलेच्या घरात शिरला. यानंतर त्याने त्याच्या जवळील रिव्हॉल्व्हर पीडित महिला आणि तिच्या दोन मुलींवर रोखून धरली. यासंदर्भात माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे आपल्या फौजफाट्यासह पीडितेच्या घरी दाखल झाले. त्यावेळी दहशत निर्माण करण्यासाठी लोखंडेने हवेत एक गोळी देखील झाडली. त्यानंतर चर्चेतून मार्ग काढू असे सांगून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बडतर्फ पोलीस लोखंडे यांने बंदुकीच्या निशाण्यावर धरलेल्या मुलांना, त्याच्या ताब्यातून सुखरूप बाजूला केलं. यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी बडतर्फ पोलीस लोखंडे यांच्यावर झडप घातली. त्यावेळी लोखंडे याने मिटकेंवर गोळी झाडली. सुदैवाने बंदुकीतून सुटलेल्या गोळीची दिशा चुकविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले असून बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील व्यावसायिक लघवीला गेला अन् 97 लाखांना मुकला पुण्यातील हडपसर परिसरात एक विचित्र घटना समोर आहे. येथील एका व्यावसायिकाला लघवीला जावून येईपर्यंत तब्बल 97 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. मालक गाडीतून लघूशंकेसाठी उतरल्यानंतर, गाडीत ठेवलेले 97 लाख रुपये घेऊन चालक फरार झाला आहे. संबंधित घटना पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. विजय हुलगुंडे असं फरार आरोपी चालकाचं नाव असून तो कोंढवा परिसरातील रहिवासी आहे. याबाबत 50 वर्षीय ड्रायफ्रूट्स व्यावसायिकानं हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. आरोपी हुलगुंडे हा मागील आठ महिन्यांपासून फिर्यादी व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करत होता. दरम्यान आरोपीनं फिर्यादीचा विश्वास संपादन देखील केला होता. पण सोमवारी 97 लाख रुपयांची रक्कम बघून चालकानं व्यावसायिकाला गंडा घातला आहे.
First published:

Tags: Ahmednagar, Crime

पुढील बातम्या